Shreya Maskar
यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि रंगांचा खेळ खेळतात. झटपट पुरणपोळी कशी बनवावी जाणून घेऊयात.
पुरणपोळीचे सारण बनवण्यासाठी बेसन, तूप, दूध, साखर, गूळ, वेलदोडा, जायफळ, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
पुरणपोळीची कणिक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ , मैदा , पाणी आणि चिमूटभर मीठ इत्यादी साहित्य लागते.
पुरणपोळीचे कणिक बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये गव्हाचे पीठ , मैदा , पाणी आणि चिमूटभर मीठ घालून सैल कणिक मळून घ्या. त्यानंतर तयार कणिक १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
पुरण बनवण्यासाठी पॅनमध्ये साजूक तुपावर बेसन चांगले भाजून घ्या. गोल्डन फ्राय करा. बेसन पॅनला चिकटू नये, म्हणून गॅस मंद आचेवर ठेवून द्या.
यात दूध, गूळ, साखर, वेलची पूड, जायफळ पूड आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून सर्व छान मिक्स करा.
आता मैद्याच्या पीठाचे छोटे गोळे करून त्याची गोल पारी लाटून घ्या. यात भरपूर बेसनचे सारण भरा आणि पोळी लाटून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून पुरणपोळी हलक्या हाताने दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. ५ मिनिटांत खमंग, खुसखुशीत पुरणपोळी तयार झाली आहे.