Dal Fara Recipe : संध्याकाळी घ्या देसी नाश्त्याचा आस्वाद, 'हा' पदार्थ खाताच मोमोज विसरून जाल

Shreya Maskar

दाल फरा

दाल फरा हा प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या भारतीय राज्यांमधील एक पारंपारिक आणि लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ आहे. तुम्ही देखील रविवारी नाश्त्याला हा पदार्थ बनवा.

Dal Fara | yandex

कोथिंबीर

दाल फरा बनवण्यासाठी रवा, तांदळाचे पीठ भिजवलेली चण्याची डाळ, तिखट, मीठ, जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, पाणी, मोहरी , कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.

Coriender | Yandex

रवा

दाल फरा बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये रवा, तांदळाचे पीठ, मीठ, पाणी घालून थोडा वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर चांगली मऊ कणिक मळून घ्या.

Semolina | yandex

मीठ

मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चण्याची डाळ, आलं, लसूण, मीठ, हिरवी मिरची, जिरे टाकून एक जाडसर पेस्ट बनवा. यात भरपूर कोथिंबीर घालायला विसरू नका.

Salt | yandex

चण्याची डाळ

तांदळाच्या पीठाचे छोटे गोळे करून त्यात चण्याच्या डाळीचे मिश्रण भरा आणि त्याचा गोल गोळा करून मध्यभागी कापून घ्या. तुम्ही याला आवडेल तो आकार देऊ शकता.

Chana Dal | yandex

वाफवून घ्या

कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यात दाल फरा शिजवून घ्या. २०-२५ मिनिटात दाल फरा चांगला वाफवून तयार होईल. तुम्ही दाल फरा तळू देखील शकता.

Dal Fara | yandex

कढीपत्ता

पॅनमध्ये तेल, मोहरी आणि कढीपत्ता घालून एक तडका तयार करा. यात शिजलेले दाल फराचे तुकडे टाका. वरून तिखट मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या. अशाप्रकारे चटपटीत दाल फरा तयार झाला आहे.

Curry leaves | yandex

आस्वाद घ्या

दाल फरा तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो केचपसोबत गरम सर्व्ह करा. याची चव तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी नक्कीच ट्राय करा.

Dal Fara | yandex

NEXT : कढी पकोडा संडे स्पेशल मेन्यू; 'ही' रेसिपी फॉलो करा कढी अजिबात फुटणार नाही

Kadhi Pakoda Recipe | yandex
येथे क्लिक करा...