Shreya Maskar
कढी पकोडा बनवण्यासाठी आंबट ताक, बेसन, कांदा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
कढी पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि हळद घालून भजीचे पीठ बनवा.
त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भजी चांगले, कुरकुरीत तळून घ्या. १०-१५ मिनिटांत खुसखुशीत पकोडे तयार होतील.
कढी बनवण्यासाठी बाऊलमध्ये दही आणि बेसन एकत्र करून चांगले मिक्स करा. त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे सतत ढवळत राहा. त्यानंतर यात ताक आणि पाणी मिसळा.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे, कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. फेटलेले दह्याचे मिश्रण पॅनमध्ये मिक्स करा.
यात चवीनुसार मीठ आणि हळद घालून कढीला उकळी आल्यावर मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या. कढीला छान सुगंध येऊ लागला की समजून जा कढी तयार झाली आहे.
शेवटी तयार कढीत तळलेले पकोडे टाका आणि ५ मिनिटे उकळू द्या. जेणेकरून पकोडे मऊ होतील आणि खाताना देखील खूप चव येईल.
कढी पकोड्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकून गरमागरम भातासोबत कढीचा आस्वाद घ्या.