Mathri Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, झटपट बनवा खमंग अन् कुरकुरीत मठरी

Shreya Maskar

नाश्ता

जंक फूड खाणे टाळा. नाश्त्यासाठी तुम्ही मठरी हा पदार्थ खाऊ शकता. हा बनवाला अगदी सोपा आहे. तसेच लहान मुलांना खूपच आवडेल.

Mathri | yandex

मठरी

मठरी बनवण्यासाठी मैदा, ओवा, काळी मिरी, कसुरी मेथी, मीठ, तूप, तीळ इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.

Mathri | yandex

कसुरी मेथी

मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा , ओवा, काळी मिरी, कसुरी मेथी, तीळ आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

Kasuri Methi | yandex

मैदा

थोडे तूप आणि पाणी टाकून मैद्याची कणिक मळून घ्या. मळलेल्या कणिकेला १५–२० मिनिटे ओल्या कापड्यात बांधून ठेवा.

Flour | yandex

मठरी बनवा

कणिक चांगली मुरल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पातळ मठरी लाटून घ्या. यावर थोडे मैद्याचे पीठ टाका.

Mathri | yandex

गोल्डन फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मठरी गोल्डन फ्राय करा. मठरी मंद आचेवर तळल्यास आतूनही पूर्ण शिजते आणि खुसखुशीत होते.

Mathri | yandex

चहाची वेळ

संध्याकाळी किंवा ऑफिसमध्ये भूक लागल्यावर गरमागरम चहासोबत कुरकुरीत आणि चटपटीत मठरीचा आस्वाद घ्या.

Tea | yandex

स्टोर करा

तयार मठरी एक महिना चांगली टिकते. तुम्ही हवाबंद डब्यात मठरी स्टोर करा. जेणेकरून ती खराब होणार नाही आणि दीर्घकाळ चांगली टिकेल.

Mathri | yandex

NEXT : घरी आलेल्या पाहुण्यांसाठी शाही Dessert, झटपट बनवा गुलकंद शिरा

Gulkand Sheera Recipe | yandex
येथे क्लिक करा...