Chetan Bodke
प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे अत्यंत चांगले समजले जाते.
दररोज व्यक्तीने त्याच्या शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका टळतो.
मात्र पावसाळ्याच्या दिवसात किती ग्लास पिणं शरीरासाठी योग्य असते हे अनेकांना माहितीच नसते.
साधारणपणे व्यक्तीने दररोज ८- १० ग्लास पाणी पिणं योग्य समजल जात.
पावसाळ्याच्या दिवसात सहसा जास्त तहान लागत नाही. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.
परंतू पावसाळ्याच्या दिवसात ही साधारण ७ ते ९ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते असे समजले जाते.
पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने शरीर डिहायड्रेशन होण्यापासून वाचते.
सदर माहिती केवळ सामान्य ज्ञानाच्या आधारावर आहे.