KajuKatli Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023: यंदाच्या भाऊबीजेला भावासाठी घरच्या घरी बनवा परफेक्ट काजूकतली; रेसिपी पाहा

BhauBeej Special : यंदाच्या भाऊबीजेला भावासाठी स्पेशल काजूकतली बनवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KajuKatli Recipe:

दिवाळीनिमित्त घराघरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. अनेक पाहुणे घरी येतात. सर्वांना मिठाई दिली जाते. यात प्रत्येक घरात असणारी मिठाई म्हणजे काजूकतली. काजूकतली अनेक लोक बाहेरुन विकत आणतात. सहसा काजूकतली घरी कोणी बनवत नाही. परंतु तुम्ही काजू कतली घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकतात.

काजू कतली सर्वजण बाहेरुन विकत आणतात. मात्र, घरच्या घरी तुम्ही काजूकतली बनवण्याची मज्जा वेगळीच असते. यंदाच्या भाऊबीजेला भावासाठी स्पेशल काजूकतली बनवा. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट काजुकतली बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • काजू (पावडर)

  • मिल्क पावडर

  • साखर

  • पाणी

कृती

  • सर्वप्रथम काजूची बारीक पावडर करुन घ्या. त्यानंतर ती बारीक चाळणीने चाळून घ्या.

  • काजूच्या पावडरमध्ये मिल्क पावडर मिसळा.

  • आता कडईत साखर घालून साखर बुडेल इतपत पाणी टाका. पाक तयार करुन घ्या. दोन तारी झाल्यावर गॅस बंद करा.

  • पाकात काजूचे संपूर्ण मिश्रण मिक्स करा. त्यानंतर परत गॅस चालू करा.

  • काजूच्या मिश्रणाचा गोळा झाल्यावर गॅस बंद करा.

  • त्यानंतर लगेच बटर पेपरवर कढईतले काजूचे मिश्रण काढा आणि लाटून घ्या. यानंतर ते काजूकतलीच्या आकारात कापून घ्या. त्यानंतर सजावटीसाठी काजूचा वर्ख लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

SCROLL FOR NEXT