बदलते वातावरण आणि जीवनशैलीमुळे शरीरावर खूप परिणाम होतो. अनेक आजार उद्भवू शकतात. यात ब्लड प्रेशरच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तरुणाईमध्ये देखील ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढत आहे. ब्लड प्रेशरला वेळीच कंट्रोलमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे हृदयाच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.
निरोगी आरोग्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक आहे. मनावरचा ताण, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे ब्लड प्रेशरच्या समस्या वाझतात. यामुळे हृदय, किडनी, मेंदूवर परिणाम होतो. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे व्यायाम आणि योगासने. योगासने करणे हे ब्लड प्रेशरच्या समस्येसाठी उपयोगी ठरते. आज आम्ही तुम्हाला ३ सोपी योगासने सांगणार आहोत. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुखासन
सुखासन केल्याने मनावरचा ताण कमी होतो. त्यामुळे बीपी नियंत्रणात राहतो. सुखासन हे श्वासासाठी उत्तम आसन आहे. याने मन आणि शरीर शांत राहते. हे आसन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. सुखासन केल्याने अनेक रोगांपासन बचाव होतो.
सुखासन करताना सर्वात आधी जमिनिवर चादर किंवा योगा मॅट ठेवून त्यावर मांडी घालून बसावे. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवावा.त्यानंतर दीर्घ श्वसन करावे. हे आसन किमान १० मिनिटे करावे.
शवासन
शवासन हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या शवासनात मन आणि शरीर एकाग्र होते. त्यामुळे मानसिक ताण नाहीसा होतो. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे आसन करु शकतात.
शवासन करण्यासाठी जमिनीवर योगा मॅटवर सरळ झोपावे. हे आसन करताना शरीरावरील सर्व ताण काढून टाकावा. त्यानंतर दोन्ही हात जमिनिला टेकलेले ठेवावेत आणि दोन्ही बाजूंनी कललेले असावेत. मान एका बाजूला असावी. एक दीर्घ श्वासन घ्यावा. त्यानंतर शवासन सुरू ठेवावे. ५ ते १० मिनिटे याच अवस्थेत राहावे. असे केल्याने शरीराप्रमाणेच मनावरील ताण निघून जातो.
भृजंगासन
भृजंगासन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे मनावरील आणि हृदयावरील ताण कमी होतो.
भृजंगासन करताना पोटावर झोपावे. दोन्ही पाय जवळ करावेत. त्यानंतर हात छातीच्या बाजूने जमिनीवर ठेवावेत. त्यनंतर हनुवटी टेकलेली असावी. लांब श्वास घेत दोन्ही हातावर भार देत उठावं. आसन सोडताना श्र्वास सोडत हळूहळू पोटाचा आणि छातीचा भाग जमिनिला टेकवावा. त्यानंतर कपाळ टेकवावे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.