Bali Pratipada 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडवा..., जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Diwali Padva 2023 In Muhurat : कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा केला जातो.
Bali Pratipada 2023
Bali Pratipada 2023 Saam Tv
Published On

Bali Pratipada 2023 In Marathi :

आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. त्यानंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करण्यापासून अनेक सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. तसेच व्यापारांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ केला जातो.

'इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो...', अशी प्रार्थना केली जाते. तसेच बळीच्या प्रतिमेला पूजले जाते. रांगोळीचा रंग, फुलांचा सुगंध, फराळाचा आस्वाद आणि आतेषबाजीच्या या उत्साहात दीपावलीचा सण साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बलिप्रतिपदा शुभ मुहूर्त

यंदा हा दिवस १४ नोव्हेंबर, मंगळवारी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचागानुसार १३ नोव्हेंबरला दुपारी ०२.५६ मिनिटांनी सुरु होईल तर १४ नोव्हेंबरला दुपारी ०२. ३६ मिनिटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार हा दिवस १४ नोव्हेंबरला साजरा (Celebrate) केला जाईल. बलीप्रतिपदेचा शुभ मुहूर्त १४ नोव्हेंबरला सकाळी ०६.४० ते ०८. ५६ मिनिटांपर्यंत असेल.

Bali Pratipada 2023
Diwali Acidity Relief Drink : फराळाचे खा खा खाल्ले? अपचनाचा त्रास होतोय? ही पेय प्या, मिळेल आराम

2. बलिप्रतिपदा कथा

बली पूजेला बलीप्रतिपदा असेही म्हणतात आणि ही पूजा कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी साजरी केली जाते. दिवाळी (Diwali) पूजेच्या दुसऱ्या दिवशी हा सण असतो. बली पूजा आणि गोवर्धन पूजा ही एकाच दिवशी असतात. गोवर्धन पूजा ही गिरिराज पर्वत आणि भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे.

3. महत्त्व

भगवान विष्णूने दिलेल्या वरदानामुळे दैत्य राजा बळीची देखील दिवाळीच्या काळात भारतात पूजा केली जाते. भगवान विष्णूच्या वामन अवताराशी संबंधित पौराणिक कथेनुसार, राक्षसाने राजा बळीला भगवान विष्णूने पाताळ लोकात नेले होते. परंतु, बळी राजाच्या औदार्यामुळे, भगवान विष्णूने त्याला पृथ्वी जगात प्रवास करण्यास तीन दिवसांची परवानगी दिली. असे म्हटले जाते की, राजा बळी पृथ्वीवर तीन दिवस राहातो. या प्रसंगी राजा बळी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो.

Bali Pratipada 2023
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : दिवाळीत मोठ्या ग्रहांची युती, या ५ राशींनी राहा सावध; आरोग्याची काळजी घ्या

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून हा दिवस द्युत प्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो.

4. व्यापारी वर्गाचे नवेवर्ष

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या दिवसांपासून व्यापारी वर्गासाठी नववर्ष सुरु होते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करुन व्यापारी वर्ग नववर्षाचा (New Year ) प्रारंभ करतात. तसेच या आर्थिक जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरु केल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com