jalna nearest tourist places Saam tv
लाईफस्टाईल

Jalna Tourist Places: जालन्यात फिरण्याचा प्लॅन करताय? ही ५ ठिकाणं आहेत बेस्ट, जाणून घ्या संपूर्ण माहीती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्हा हा बियाणांच आगार म्हणून ओळखला जातो. जालना जिल्हा हा छ.संभाजीनगरच्या पुर्वेकडे आहे. हा जिल्हा १ मे १९८१ मध्ये स्थापीत झाला. जालना हा जिल्हा संकरित बियाणे उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तसेच बिडी उद्योग , स्टील री रोलींग मिल्स आणि डाळ मिल व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच सोबत जालना जिल्हा हा महाराष्ट्रातल्या सर्वात पोलाद उद्योगापैंकी एक आहे. आता आपण तिथल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांन बद्दल जाणून घेऊ.

जांबसमर्थ, घनसावंगी

संत रामदास स्वामी यांचा जन्म जालन्यातला घनसावंगी तालुक्यात झाला. तिथेच असणाऱ्या राम मंदीरामध्ये दरवर्षी राम नवमी निमित्त खूप मोठी यात्रा भरते. हे राम मंदीर रामदास स्वामींच्या घरामध्येच आहे. तिथे पर्यटकांना राहण्यासाठी तिथे काम करणारे मंडळ सर्व सुविधा उपलब्ध करून देतात.

घनसावंगीला जायचं कसं ?

तुम्ही विमानाने जाणार असाल तर जालनापासून थोड्या दुरवर असणाऱ्या चिकलथाना विमानतळावर याल. तिथून पुढे घनसावंगीसाठी बस सुविधा आहेत.

तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर तुमच्या जवळच्या स्टेशनपासून परतूर स्टेशनला या पोहोचा. पुढे तुम्हाला जाम समर्थ पर्यंत सहज गाड्या मिळतील.

जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर जालना जिल्हात उतरून पुढे जांबसमर्थला जाण्यासाठी बस उपलब्ध असतील.

मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा

मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया या ठिकाणी आहे. हे ठिकाण जालन्यातल्या डोणगांव येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांना वली अल हिंद या पदासाठी नियुक्त करण्यात आले होते. हे शिक्षणासाठी कैरो, इजिप्त यांसारख्या प्रगत देशात शिकायला गेले होते. ते 467 AH मध्ये परत आले आणि डेक्कन गेले. शेवटी डोणगाव ता. अंबड, जि. जालना येथे त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणाला पर्यटक खूप मोठ्या संख्येने भेट द्यायला जातात.

मजार-इ-मौलयाला जायचं कसं?

तुम्ही विमानाने जाणार असाल तर चिक्व्लथाना या विमानतळावर या. तिथून पचोड या ठिकाणची बस तुम्हाला मिळेल.

तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर तुमच्या जवळच्या स्टेशनपासून औरंगाबादला उतरा. तेथून पचोड साठी बस तुम्हाला मिळतील.

जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर पाचोडला पोहचा. तिथून २ कि.मी. अंतरावर असलेल्या डोणगांवला जाण्यासाठी रिक्षा किंवा बसचा आधार घ्या.

मत्स्योदरी देवी

जालनाच्या दक्षिणेला मत्स्योदरी देवी मंदीर आहे. ते अंबड या भागात आहे. हा भाग जालन्यातला टेकडीचा भाग आहे. त्या टेकडीचा आकार मासोळी सारखा ( मत्स्य ) आहे. त्यामुळे मत्स्योदरी देवी मंदीर हे खूप प्रसिद्ध आहे. काही पर्यटक दरवर्षी या मंदीराला भेट द्यायला जातात.

मत्स्योदरी देवी मंदीरापर्यंत जायचं कसं?

तुम्ही विमानाने जाणार असाल तर जालनापासून थोड्या दुरवर असणाऱ्या चिकलथाना विमानतळावर याल. तिथे तुम्हाला अंबडसाठी नियमीत बस मिळेल.

तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर तुमच्या जवळच्या स्टेशनपासून जालना पर्यंत पोहोचाल. तिथून अंबडसाठी बस मिळेल.

जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर जालनाला उतरून तुम्हाला तिथून अंबडसाठी बस मिळेल.

गुरु गणेश तपोधाम

जैन धर्मांच पवित्र स्थान म्हणजे गुरु गणेश भवन. हे जालना शहरामध्ये येते. गुरु गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जातात. ईथे ट्रस्टमार्फत शालेय संस्थान, महाविद्यालयात, अंधांची शाळा, ग्रंथालय , गोशाला चालविल्या जातात.

गुरु गणेश तपोधामपर्यंत जायचं कसं?

तुम्ही विमानाने जाणार असाल तर जालनापासून थोड्या दुरवर असणाऱ्या चिकलथाना विमानतळावर याल. हे अंतर ६४ कि. मीटर येवढे आहे. तिथून तुम्ही रिक्षाने गुरु गणेश तपोधामपर्यंत पोहोचू शकता.

तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर तुमच्या जवळच्या स्टेशनपासून जालना पर्यंत पोहोचाल.तिथेच जवळच तुम्हाला हे भवन दिसेल.

जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर थेट जालनात तुम्ही येऊ शकता.

Edited By : Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT