Shreya Maskar
तुम्ही वीकेंडला मुंबईजवळील तानसा तलावाला भेट द्या. येथे तुम्हाला सुंदर वातावरण अनुभवता येईल. तुम्ही निवांत वेळ येथे घालवू शकता.
तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा नदीवर बांधलेला आहे. तानसा तलाव महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालतो.
तानसा तलाव मुंबईला पाणीपुरवठा करतो आणि ते एक दगडी धरण आहे.
१८९२ मध्ये तानसा नदीवर बंधारा घालून तानसा तलाव बांधण्यात आला. तलावाची रचना खूपच आकर्षक आहे.
तानसा तलावाच्या सभोवताली हिरवीगार वातावरण पाहायला मिळते. येथे एक वन्यजीव अभयारण्य आहे.
तानसा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात येते. या अभयारण्य विविध पक्षी पाहायला मिळतात.
तानसा तलाव हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आहे. वन्यजीव प्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.