Shreya Maskar
सुट्टीमध्ये कुटुंबासोबत नाशिक येथे पिकनिक प्लान करा. येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तेथील माणिकपुंज किल्ल्याला भेट द्या.
नाशिक जिल्ह्यातील माणिकपुंज किल्ला हा एक ऐतिहासिक गड आहे, जो नांदगाव तालुक्यात आहे. हे इतिहासातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.
माणिकपुंज किल्ला ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा सहज सोपा ट्रेक आहे. तुम्ही येथे पहिल्यांदा ट्रेक प्लान करू शकता.
माणिकपुंज किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे, जे एका गुहेत आहे. येथे तुम्हाला देवीचे दर्शन होते.
माणिकपुंज किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि दगडी चौथरा यांसारख्या गोष्टी आहेत. किल्ल्याची मजबूती आजही भक्कम आहे.
माणिकपुंज किल्ल्याजवळ हेदुली धबधबा, माणिकपुंज धरण आणि राजा खोजा किल्ला आहे. सुट्टीत येथे आवर्जून भेट द्या.
नाशिक स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने माणिकपुंज किल्ल्यावर जाऊ शकता. हिवाळ्यात तुम्ही येथे आवर्जून भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.