Shreya Maskar
कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे पठार यवतेश्वर गावाजवळ आहे. दिवाळीच्या सुट्टीत येथे नक्की जा.
कास पठार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. याला 'महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' असेही म्हणतात.
पावसाळा आणि हिवाळा कास पठाराला भेट देण्यासाठी योग्य आहे. येथे सुंदर वातावरण पाहायला मिळते.
सातारा बसस्थानकावरून बामणोलीकडे जाणाऱ्या बसने कास पठारापर्यंत पोहोचू शकता.
कास पठारावर रंगीबेरंगी फुलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. फोटोशूटसाठी हे एक भन्नाट लोकेशन आहे.
कास पठार हे त्याच्या विविध रानफुलांसाठी आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. कास पठाराला 'फुलांची दरी' असेही म्हणतात.
कास तलाव हा सातारा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे आणि तो कास पठाराजवळ आहे.
कास पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले, झुडुपे आणि गवत आढळतात, येथे हिरवेगार वातावरण अनुभवता येते. आयुष्यात एकदा तरी कास पठाराला भेट द्या.
NEXT : दिवाळीत पाडव्याला बायकोसोबत करा स्पेशल ट्रिप प्लान, मुंबईजवळ वसलंय बेस्ट लोकेशन