Shreya Maskar
दिवाळीत पाडव्याला पिकनिक प्लान करून स्पेशल गिफ्ट द्या. सुट्टीत मुंबईजवळील रायगडची सफर करा.
रायगडमधील अरावी बीचवर तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. वीकेंडसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. त्यामुळे आताच ट्रिप प्लान करा.
अरावी बीच रायगड जिल्ह्यात शेखाडी येथे आहे. हा शांत, सुंदर आणि पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे. येथे परदेशी पर्यटक देखील येतात.
आरावी बीचवर जलक्रीडांचा आनंद घेता येतो. स्पीड बोट राईड, जेट स्कीइंग, स्कुबा डायव्हिंग, बोटिंग, बनाना राईड यांचा समावेश आहे.
अरावी बीच दिवेआगर आणि श्रीवर्धनच्या जवळ दोन खडकाळ टेकड्यांमध्ये वसलेला आहे. त्यामुळे येथे आल्यावर दिवेआगर आणि श्रीवर्धनला देखील नक्की भेट द्या.
अरावी बीच वर सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. हा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. तुम्ही येथील सौंदर्यात हरवून जाल.
समुद्रकिनारी फोटोशूट करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तसेच तुम्ही प्री वेडिंग शूट देखील तुम्ही येथे करू शकता.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही अरावी बीचला भेट द्या. निसर्गाचा अद्भुत नजारा येथे पाहायला मिळतो. येथे जाताच तुमचा जोडीदार खुश होईल.