Shreya Maskar
दिवाळीत कोकण वारी करा. कोकणात रत्नागिरी येथे सुंदर ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात. त्यामुळे हे फॅमिली पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रसिद्ध महिपतगड किल्ला आहे. हा गिरीदुर्ग आहे. या किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे येथे नक्की जा.
महिपतगड किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेवर वसलेला असून रसाळगड आणि सुमारगड यांसारख्या किल्ल्यांच्या जवळ आहे. हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते
दहिवली गावामधून महिपतगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक पायवाट आहे. ही पायवाट लांबची आहे. या मार्गाने जाताना दोन खिंडी पार कराव्या लागतात.
शिवाजी महाराजांच्या काळात 1676 मध्ये महिपतगड स्वराज्यात होता. इतिहासात या किल्ल्याचे मोलाचे योगदान आहे.
महिपतगड किल्ल्याला एकूण सहा मुख्य प्रवेशद्वारे आहेत. किल्ल्याची तटबंदी मजबूत होती. किल्ल्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल पाहायला मिळते.
महिपतगड किल्ल्यावरून सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसते. विशेषतः, मावळत्या सूर्यप्रकाशात सह्याद्रीच्या रांगांचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.