Coastal Road : दक्षिण मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३० मिनिटात पोहोचता येणार; कसा आहे मार्ग? कधी होणार सुरू?

Bandra Worli Sea Link Coastal Road : वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा कोस्टल रोड अंशतः खुला करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे दक्षिण मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानतळवर ३० मिनिटात पोहोचता येणार आहे.
Coastal Road
Coastal Road Saam Digital
Published On

मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे, ज्यात वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा कोस्टल रोड अंशतः खुला करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे दक्षिण मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत कोस्टल रोड आधीच कार्यान्वित आहे. तसंच सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टर पुलामुळे आता वाहनचालकांना शहरातील गर्दी टाळून सुमारे ३० मिनिटांत विमानतळ गाठता येणार.

सध्या मरीन लाईन ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास दोन तासांचा वेळ लागतो. नवीन मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरातील दक्षिण उपनगरे आणि विमानतळातील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. या रोडची प्रशंसा झाली असली तरी सी लिंक टोल बूथ आणि ब्रीच कँडी आणि वरळीतून बाहेर पडताना संभाव्य वाहतूक कोंडीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित केले ती नसेल तर, हा संपूर्ण प्रकल्पावर जरी मोठा खर्च केला तरी त्याचा फायदा होणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मरीन ड्राइव्हवर अशी समस्या नाही त्यामुळे तिथून बाहेर पडणं अधिक सोईचं आहे.

वांद्रे-वरळी सीलिंक आणि कोस्टल रोड जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन, नागरिकांना मरिन ड्रायव्ह वरुन वांद्रेत १२ मिनिटांत पोहचता येणार आहे. यामुळे ७० टक्के वेळ आणि ३० टक्के इंधनाची बचत होणार आहे.

Coastal Road
National Highway Toll Free : वाहनधारकांसाठी खूशखबर! आता २० किलोमीटरपर्यंत करता येणार टोलमुक्त प्रवास, काय आहेत नियम, वाचा सविस्तर

मुंबई शहरात प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे. त्यातील कोस्टल रोड हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. सध्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सीलिंकपर्यंत १०.५८ किमी मार्गाच्या या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यापैकी मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.

कोस्टल रोडचा ४.५ किमी लांबीचा पुढील टप्पा वांद्रे-वरळी सीलिंकला जोडण्यात आला आहे. १३६ मीटरच्या सर्वात मोठ्या बो-स्ट्रिंग आर्च गर्डरचा वापर करून हा मार्ग जोडण्यात आला आहे. सुमारे दोन हजार मेट्रिक टन वजनाच्या या महाकाय गर्डरची बांधणी रायगड जिल्ह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्याने त्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहचालकांना मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत १२ मिनिटांत पोहोचता येणार आहे.

Coastal Road
9/11 Special Story : ४५४६ विमानांनी उड्डाण भरलं अन् काही मिनिटात ४ हायजॅक; 9/11 च्या हल्ल्यातील फ्लाईट ९३ ची अंगावर काटा आणणारी स्टोरी, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com