9/11 Special Story : ४५४६ विमानांनी उड्डाण भरलं अन् काही मिनिटात ४ हायजॅक; 9/11 च्या हल्ल्यातील फ्लाईट ९३ ची अंगावर काटा आणणारी स्टोरी, वाचा सविस्तर

9/11 Flight 93 Story : ही स्टोरी आहे अमेरिकवेर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यातील फ्लाईट-९३ ची, ज्यातील ४० प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी कॅपटल हिलला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
911 Special Story
911 Special StorySaam Digital
Published On

११ सप्टेंबर २००१, सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये संपूर्ण अमेरिका न्हावून निघाली होती. नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाचंही कामकाज सुरळीत सुरू झालं, मात्र सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा दिवस जगातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आणि पर्ल हार्बरनंतर अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्यात बदणार होता. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरना जेव्हा दोन विमानांनी टक्कर दिली, त्यावेळी अमेरिकी प्रशासनाला हल्ल्याची भीषणता आणि संपूर्ण अमेरिका संकटात असल्याचा आभास झाला...यावेळेला अमेरिकेवर ४५४६ विमानांनी उड्डान भरलं होतं आणि ४ विमानांचं अपहरण झालं होतं.. अमेरिकन आर्मी आणि सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती...त्यातील एका विमानाची ही थरारक स्टोरी आहे, ज्यातील प्रवाशांनी बलिदान देत अमेरिकेची अस्मिता आबाधित ठेवली होती.

फ्लाईट ९३, हायजॅक झालेल्या त्या ४ विमानांपैकी एक जे धडकणार होतं कॅपिटल हिलला..कॅपिटल हिल (Capitol Hill) हे अमेरिकेचं प्रमुख राजकीय आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखलं जातं. संयुक्त राज्य अमेरिका काँग्रेसचं हे मुख्यालय आहे, जीथे अमेरिकेचं संसदभवन आहे. इथेच अमेरिका सरकारचे मुख्य निर्णय घेतले जातात. त्यामुळे ९/११ च्या हल्ल्यात फ्लाईट ९३ ला आणि विमानातील ४४ प्रवाशांच्या बलीदानाला विशेष महत्त्व आहे.

फ्लाईट ९३, ८ वाजताच्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४० मिनिटांनी उशिरा उड्डाण भरणारं होतं... युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग 757 चं हे विमान न्यू जर्सीच्या नेवार्क येथून सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियाकडे उड्डाण भरण्यासाठी वाट पाहात होतं... त्याचवेळी अरबी वंशाचे चार नागरिक बिझनेस क्लासच्या सहाव्या लाईनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते... त्यांनी आपल्या परतीचं तिकीट घेतलं नव्हतं... टॉम मॅकमलन फ्लाईट ९३ मध्ये लिहितात, इतकी अचूक तयारी केल्यानंतरही अल-कायदाने याचा कधी विचारचंही केला नव्हता, की फ्लाईटच्या उड्डाणाला विलंब पण होऊ शकतो.

अल-कायदा अमेरिकेवर हल्ल्याचा कट १९९६ मध्ये अफगाणिस्तानातील पर्वतीय दुर्गम भागात रचला होता आणि त्यानंतर जवळपास ६ वर्ष या कटाची तयारी केली जात होती. वेळेनुसार तयारीत बदलही करण्यात आला होता...मात्र सर्वकाही ठरल्याप्रमाणे वेळेत व्हावं यावर या कटाचं यश अवलंबून होतं. अपहरणासाठी ज्या चार विमानांची निवड करण्यात आली होती, ती सर्व विमानं ७.४५ ते ८.१० च्या दरम्यान उड्डाण भरणार होती आणि २५ मिनिटांच्या अंतरामध्ये ही चारही विमानं टेक ऑफ करणार होती...टेक ऑफच्या १५ मिनिटानंतर हायजॅक करण्यास सुरवात करण्याचा कट होता...जर अल कायदाने ठरल्याप्रमाणे सर्वकाही झालं असतं तर प्रत्येक विमानं त्या ठरलेल्या ठिकाणांना धडकली असती, तर अमेरिकेचे राजकीय नेते आणि अमेरिकी सैन्याला विचार करण्याचा वेळही मिळाला नसता. त्यातील फ्लाईट ९३ तर कॅपिटल हिलला धडकणार होतं.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात २६०६ लोक मारले गेले होते, तर पॅन्टागॉनवर झालेल्या हल्ल्यात आणखी २०६ जणांचा मृत्यू झाला होता. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या रेकॉर्डनुसार, ठीक ८ वाजून ४१ मिनिट ४९ सेकंदांनी एअर ट्राफीक कन्ट्रोलरने संदेश दिला की फ्लाईट ९३ चे कॅप्टन जेसन डाल आणि फर्स्ट ऑफिसर लेरॉय होमरला रनवे चार वर टेक ऑफ करू शकतात. एक मिनिटानंतर बिझनेस क्लासमध्ये बसलेले झियाद झर्राह, अहमद अली नमी, अहमद अल हजनवी आणि सईद अल घमदी यांनी मनातल्या मनात स्वत:ला मिशनसाठी तयार केलं. तो दिवस होता ११ सप्टेंबर २००१, आणि अंतिमत: विमानाने उड्डाण भरलं.

१८२ विमानांची क्षमता असलेल्या हे विमान आज ८० टक्के रिकामी होतं. विमानात ३३ प्रवासी आणि क्रू मेंबर होते. ठीक ८ वाजून ४० मिनिटांनी अमेरिकन एअर लाइन्सचं हे विमान ५०० किमी वेगाने पुढे सरकत होतं. त्याचवेळी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेटॉगॉनच्या हल्ल्यानंतर अमेरिकन एअरलाईन्सने १६ विमानांना खतरा असल्याचा इशारा दिला, कॉक पेटमधील हल्ल्यापासून सावधान!..फ्लाईट ९३ ला हा संदेश ९ वाजून 24 मीनिटांनी मिळाला. 9 वाजून २६ मिनिटांनी कॅप्टन जेसन डाल सूचना मिळल्याची पुष्टी दिली. पुढच्या दोनच मिनिटात ९ वाजून 2८ मिनिटांनी कॉकपेटच्या दरवाजावर गोंधळ ऐकू आला.

911 Special Story
Explainer : मंकीपॉक्स खरंच मासांहारातून पसरतो का? पोलिओशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर

डोक्यावर लाल स्कार्प बाधून आलेल्या चारही अलकायदाच्या आतंकवादी वेगाने कॉकपीटकडे धाव घेतली आणि ९ वाजून २८ मिनिट ५ सेकंदांनी कॉकपीटमध्ये प्रवेश केला. याचा सर्वात मोठा पुरावा होता तो म्हणजे विमान अवघ्या ३० सेकंदात ६८० फूट खाली आलं होतं. त्यावेळी क्लिनलेव च्या ट्राफीक कन्ट्रोलरला आवाज आला, "हे गेट आऊट ऑफ हियर" तीन वेळा हा आवाज ऐकू आला. झटापटीचा आवाजही ऐकू येत होता.. दोन्ही पायलटनी जाणीवपूर्वक मायक्रोफोन सुरू ठेवला असावा.. जेणेकरून कॉकपेटमध्ये काय सुरू आहे याचा आवाज जमिनीवर असलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल.

मिचेल सुकॉफ आलल्या फॉल अॅण्ड राईस द स्टोरी ऑफ ९/११ मध्ये लिहितात, पुढच्या ९० सेकंदात क्लिवलेन्ड एअर ट्राफीक कन्ट्रोलर जॉन वर्थने फ्लाईटशी संपर्क करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला, मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. थोड्याच वेळात कन्ट्रोलरला याचं उत्तर मिळालं. ९ वाजून ३१ मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीने दीर्घ श्वास घेत एका वेगळ्या शैलित बोलण्यास सुरुवात केली. हा संदेश विमानातील प्रवाशांसाठी होता, मात्र ऐकला एअर ट्राफीक कन्ट्रोलरने

"लेडिज अॅण्ड जेन्टलमन, हिअर द कॅप्टन, प्लिज सीट डाऊन. किप रिमेनिंग सिटिंग, वुई हॅव अ बॉम्ब. सो सर."

जियाद जर्राहचा फ्लाईट ९३ वर कब्जा झाला होता. ९ वाजून ३९ मिनिटांनी जियाद जर्राहने पुन्हा घोषणा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो पहिल्या पेक्षा निर्धास्त वाटला. त्याने पुन्हा तोच संदेश दिला आणि निश्चित रहा आपल्या काही डिमांड असल्याचं सांगितलं. याच दरम्यान एका व्यक्तीच्या पोटात चाकू खूपसण्यात आला होता, यात तो गंभीर जखमी झाला होता.विमानातील प्रवाशांना विमानाच्या मागच्या बाजूला नेण्यात आलं होतं.

अमेरिकन एअर लाईन्सच्या इशाऱ्यानंतर ४५४५ विमानं जवळच्या विमानतळांवर लँड झाली, मात्र फ्लाईट ९३ वर या इशाऱ्याचा कोणताही फरक पडला नाही. तोपर्यंत अमेरिकन नागरिकांना अंदाज आला की विमान एकतर व्हाईट हाऊस किंवा कॅपिटल हिलच्या दिशेने वळत आहे. यावेळी विमानातील प्रवाशांनी आतंकवाद्यांना रोखण्याची योजना बनली होती.

ज्या प्रवाशांनी आणि क्रूने त्यांच्या फोन कॉल्सद्वारे देशभरात चाललेल्या घटनांची माहिती मिळवली. फ्लाईट ९३ ही हत्यारासारख वापरलं जाणार होतं. ते पण अमेरिकचं संसद भवन उदध्वस्त करण्यासाठी . दहशतवाद्यांचा हा कट हाणून पाडण्यासाठी प्रवाशांनी विमानाचे नियंत्रण मिळवण्याची योजना आखली. प्रवाशांचा हा शौर्यपूर्ण प्रयत्न विमानाच्या ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग्समध्ये नोंद झाला आहे, ज्यात त्यांच्या शेवटच्या संघर्षाच्या आवाजांचा समावेश आहे.

विमानाचा शेवट: प्रवाशांनी केलेल्या या संघर्षामुळे फ्लाइट 93 वॉशिंग्टन डी.सी. पर्यंत पोहोचू शकलं नाही आणि पेनसिल्व्हेनिया येथील एका शेतात क्रॅश झाली. या घटनेत सर्व 40 प्रवासी आणि क्रू सदस्य तसेच चार दहशतवादी ठार झाले. असं मानलं जातं की प्रवाशांनी धैर्य दाखवले नसते, तर हे विमान वॉशिंग्टन डी.सी.मधील कॅपिटल हील किंवा कोणत्याही प्रमुख सरकारी इमारतीवर धडकले असते, ज्यामुळे अधिक विध्वंस झाला असता.

फ्लाइट 93 ची कहाणी शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक बनली आहे. 9/11 च्या हल्ल्यांदरम्यान ही एक महत्त्वाची घटना म्हणून पाहिली जाते, जिथे सामान्य नागरिकांनी मोठा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी आपले प्राण दिले. आज फ्लाइट 93 मधील प्रवासी आणि क्रू सदस्यांना नायक म्हणून आठवले जाते आणि पेनसिल्व्हेनियातील क्रॅश साइटवर त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभे केले गेले आहे.

911 Special Story
National Highway Toll Free : वाहनधारकांसाठी खूशखबर! आता २० किलोमीटरपर्यंत करता येणार टोलमुक्त प्रवास, काय आहेत नियम, वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com