Pune Breaking News : पुण्यात खळबळ; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोळीबार

नेमका हा गोळीबार कुणी केला. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Breaking News, Pune
Breaking News, Pune saam tv

Pune Crime News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या सनसिटी भागात गोळीबार झाल्याचे खळबळजनक घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गोळीबार करण्यात आला आहे. रमेश बद्रीनाथ राठोड यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून यात ते जखमी झाले आहे. नेमका हा गोळीबार कुणी केला. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या सनसिटी भागात गोळीबाराची घटना घडली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या ही गोळीबाराची घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडली आहे.

गोळीबार रमेश बद्रीनाथ राठोड नावाच्या व्यक्तीवर करण्यात आला आहे. गोळीबारात रमेश बद्रीनाथ राठोड जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला बंदुकीच्या दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात जखमी झाल्यानंतर रमेश राठोड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात २४ तासात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com