ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पर्यटनासाठी सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ला.पन्हाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लहान शहर आहे.
पन्हाळा हा कोल्हापूर शहरापासून २० किमी अंतरावर आहे.
प्रसिध्द असलेला पन्हाळा किल्ला दख्खनच्या किल्ल्यांपैकी सर्वात मोठा आहे.
पन्हाळ्यात सगळे पदार्थ स्वस्तात मिळतात. तसेच तिथे जाण्यासाठी जास्त पैसे खरचं होत नाहीत.
पन्हाळ्यातले वातावरण हे तुम्हाला आपलसं करणारं आहे. पर्वतांचे निसर्गरम्य दृश्य, आल्हादायक वातावरणासाठी पन्हाळा किल्ला हा पर्यटकासाठी नेहमीच आकर्षक ठरला आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील सोळा महिन्यांहून अधिक काळ पन्हाळा किल्यात घालवला आहे.
पन्हाळा येथे भेट देताना पर्यटकांसाठी कमी बजेटची हॅाटेल्स सुद्धा आहेत. तिथे तुम्ही कोल्हापूर स्टाईलचे जेवण खाऊ शकता.
तिथे असणारी हॉटेलं तुम्हाला घरगूती जेवणाचा आस्वाद नक्कीच देतील. तिथे झुणका भाकर थाळी खूप प्रसिद्ध आहे.
पन्हाळ्याच्या किल्याला भेट देताना पर्यटकांना कोल्हापुरी पदार्थ खायला मिळतील. त्यात कोल्हापुरी मिसळ नक्कीच तुम्ही खावू शकता.
पन्हाळ्याला भेट देण्यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्यात जावू शकता. तिथला सुर्योदय पाहण्यासाठी बरेच पर्यटक संध्याकाळच्या वेळेस पन्हाळ्याला जाण्याचा प्लॅन करतात.
NEXT: वाई मार्गे सातारा जाणं ठरेल भारी; घडेल दक्षिण काशीचं दर्शन