Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला, रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO

Rohit Sharma Emotional Celebration After Ind vs Sa Final: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसीची ट्रॉफी जिंकल्यानंतर भावुक करणारं सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला,रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO
rohit sharma with mitchell marshinstagram

बारबाडोसच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने आयसीसीची ट्रॉफी उंचावली आहे. हा कारनामा भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना करून दाखवला आहे. दरम्यान सामना जिंकताच रोहितने असं काही केलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रोहितने खेळपट्टीची माती तोंडात घातली

भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. या खेळाडूंनी आयसीसीच्या प्रत्येक टूर्नामेंटमध्ये पूर्ण जोर लावला. मात्र कुठेतरी नशिबाची साथ मिळत नव्हती. भारतीय संघ सेमिफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश करत होता. मात्र शेवटी भारतीय संघाच्या हाती निराशाच येत होती. यावेळी खेळाडूंनी आणि नशिबानेही साथ दिली आणि भारतीय संघाने आयसीसीची ट्रॉफी उंचावली.

Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला,रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO
IND vs SA, Final: जय शहांची भविष्यवाणी खरी ठरली! रोहित अन् हार्दिकने बारबाडोसमध्ये रोवला तिरंगा; VIDEO

फायनलमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. विजयानंतर एकीकडे भारतीय खेळाडू जल्लोष करत होते. तर दुसरीकडे रोहित शर्माने असं काही केलं ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला,रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO
IND vs SA, Final: विराटने शब्द राखला! रोहितने जे सेमिफायनलमध्ये म्हटलं ते कोहलीने फायनलमध्ये करुन दाखवलं

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना कोणीच विसरू शकत नाही. या सामन्यात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कोट्यावधी क्रिकेट फॅन नाराज झाले होते. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात तो आयसीसी ट्रॉफीवर पाय ठेवून बसला होता. हा फोटो भारतीय क्रिकेट फॅन्सच्या जखमेवर मिठ चोळणारा होता.

हाच फरक आहे

एकीकडे मिचेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने खेळपट्टीची माती चाखली. सामन्यानंतर रोहित शर्मा खेळपट्टीवर गेला आणि खाली बसून खेळपट्टीची पवित्र माती हातात घेतली आणि तोंडात घातली. या भावुक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com