T20 World Cup Final: हार्दिक, विराट आणि रोहितसाठी अग्निपरीक्षापेक्षा कमी नव्हता अंतिम सामना; खेळाने दिलं टीकाकारांना उत्तर

T20 World Cup Final Ind vs SA : टी२० विश्वचषकाचा अखेरचा सामना भारतीय संघाने ७ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. हा सामना विराट कोहली, रोहित शर्मासाठी परीक्षेसारखा होता.
T20 World Cup Final: हार्दिक, विराट आणि रोहितसाठी अग्निपरीक्षापेक्षा कमी नव्हता अंतिम सामना; खेळाने दिलं टीकाकारांना उत्तर
T20 World Cup Final Ind vs SAx

कोणी पत्रकारांशी बोलतांना हुकदा फोडतोय तर कोणी प्रत्येक खेळाडूला भेटत आपला आनंद व्यक्त करतोय. मैदानात खेळाडू आणि मैदानाबाहेर प्रेक्षक सर्वांच्याच डोळ्यात पाणी. हा क्षण होता भारतीय संघाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी २० विश्वकप जिंकल्याचा. भारतासाठी क्रिकेट फक्त हा खेळ नाही तर एक भावना आहे, असं म्हटलं जातं, त्याचाच अनुभव २९ जूनला सर्व भारतीयांनी पुन्हा एकदा घेतला.

जीडीपी कमी जास्त झाला असेल किंवा शेअर्स ढामपणे खाली कोसळले असले, तेव्हाही इतकी चिंता लोकांना वाटत नाही. तितकी चिंता लोकांना भारताच्या क्रिकेट सामन्यावेळी वाटत असते. भारतीय आणि क्रिकेट हे वेगळंच नातं तयार झालंय. याच नात्याच्या अपेक्षा टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत आपण चॅम्पियन कसं आहोत, हे पटवून दिलं.

अखेरच्या षटकात हार्दिकने दोन विकेट्स घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताचा विजय होताच कर्णधार रोहित शर्माने धरती मातेला मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला. तर भरलेल्या डोळ्यांनी विराट कोहलीने प्रेक्षकांनी दिलेल्या समर्थनाचे आभार मानले. टीम इंडियाने १७ वर्षांनी विश्वकप जिंकत प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हासू आणलं. पण या अंतिम सामन्यातील हा विजय या खेळाडूंसाठी सोपा नव्हता. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या या खेळाडूंसाठी हा अंतिम सामना अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हता.

रोहित शर्मा, विराट कोहली आपल्या फॉर्ममुळे टीकेचे धनी बनत होते. तर आपल्या कौटुंबिक कारणामुळे आणि आयपीएलमध्ये झालेल्या मानसीक त्रासाने खचलेल्या हार्दिकसाठी हा विश्वकप खूप महत्त्वाचा होता. या स्पर्धेत त्यांनी खेळाडूचा धर्म निभावत आपल्या वैयक्तिक अडचणींवर मात करत टीकाकारांचे प्रेमही मिळवलं. अख्या टी२० विश्वकपच्या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने एकही सामना न गमावता सर्व सामन्यांमध्ये ए-वन कामगिरी केली.

रोहित-विराटसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न

खेळ म्हटलं तर विजय पराजय येतोच. पण रोहित आणि विराटसाठी हे बोलून चालणार नव्हतं. दोन्ही खेळाडू जगविख्यात आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत.अशा खेळाडूंना ऑउट ऑफ फॉर्ममुळे घरी बसावं लागलं, हा शिक्का घेऊन बसणं म्हणजे प्रतिष्ठा मलीन होण्यासारखचं आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी२० वर्ल्डकप रोहित आणि विराटसाठी प्रतिष्ठेचा होता.

बर्बाडोसा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत पराभूत होईल, असं वाटत होतं पण शानदार नेतृत्त्व करत रोहितने भारतीय संघाला कप आणि करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद मिळवून दिला. संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्माने घेतलेले निर्णय योग ठरले. अंतिम सामन्यातही शर्माचं नेतृत्त्व गुण सर्वांना दिसून आलं. बुमराहच्या गोलंदाजीचा योग्य वेळी केलेला उपयोग असो किंवा ५ नंबरवर अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पाठवणं असो. हे सर्व गोष्टी त्याच्या नेतृत्त्वाची धमक दाखवणारे ठरले.

पण याच रोहितच्या कामगिरीवर आणि त्याच्या नेतृत्त्वावर टीकाकारांनी बोटं उचललं होतं. टी २० विश्वचषक २०२४ ची घोषणा झाली. तेव्हा भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट चाहते नैराश्यात होते. त्याचं कारण होतं, एकदिवशीय क्रिकेट विश्वकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला पराभव. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार बदलला जाणार या चर्चांनी रान पेटवलं होतं. त्यात रोहितच्या नेतृत्त्वावर प्रश्न केली जाऊ लागली होती. त्यामुळे त्याच्या खेळावर परिणामदेखील झाला होता.

आयपीएलच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर रोहित आणि विराटला टी२० च्या संघात घेतलं जाईल, असं म्हटलं जात होतं. त्याचं दडपण घेत आयपीएलच्या सामन्यात दोन्ही खेळाडू उतरले. पण तोच मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद रोहितकडून काढून घेत ते हार्दिक पंड्याकडे देण्यात आलं. आधीच वर्ल्डकपमधील अपयशामुळे नैराश्यात असलेल्या रोहितसाठी हा एक मोठा धक्का होता. पण या निर्णयाने हार्दिक पंड्यालाही मानसीक त्रास सोसावा लागला.

तर विराट कोहलीसाठी आपला फॉर्म कायम ठेवणं हे एक चॅलेंज होतं. आयपीएल आणि आधीच्या सामन्यांमध्ये कोहली संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनला होता. त्यामुळे त्याला आपल्या खेळात चपळता आणावी लागणार होती. आयपीएलमध्येही त्याचा फॉर्म हा संमिश्र राहिला होता. पण प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांनी विश्वास दाखवत कोहलीला विश्वकपच्या संघात स्थान दिलं. पण तो यातही काही विशेष करू शकला नव्हता.

फायनल सामन्यापूर्वी विराट कोहलीसाठी संपूर्ण स्पर्धा खूपच खराब रहिली. त्याने ७ डावात केवळ ७५ धावा केल्या, ज्यामध्ये एकही अर्धशतक करता आले नाही. कोहलीला त्याच्या फलंदाजीत आक्रमकता ठेवता आली नाही. याआधीही त्याच्या खेळात आक्रमता दिसली नव्हती. विराटची ही स्थिती बघता कर्णधार रोहित शर्मालाही त्याच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान विजयी अर्धशतक करत विराटने टी२०च्या सामन्यांमधून निवृत्ती घेतली आणि हा क्षण स्मरणात ठेवला.

हार्दिकची स्वतःशीच होती लढाई

टी२० विश्वचषकाच्या आधीपासून हार्दिक आपल्या कौटुंबिक कारणामुळे खूप चर्चेत आला होता. त्यात आधी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आल्याने त्याला ट्रोल केलं गेलं होतं. त्याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला होता. आयपीएल संपत नाही तोच त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे हार्दिक नैराश्यात गेला होता. आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या मु्ंबईच्या संघाने पाचवेळा आयीपीएलचं टायटल जिंकलं होतं. त्याच मुंबईला यावेळी आपलं आव्हान टिकवता आलं नव्हतं. या सर्वांचं खापर हार्दिकच्या नावावर फोडण्यात आलं होतं.

या स्पर्धेदरम्यान त्याला चांगली खेळीही करता आली नव्हती. आयपीएल सामने झाल्यानंतर त्याच्या संसारातील चर्चांनी तो अधिक डिस्टर्ब झाला. त्यामुळे या टी२० विश्वकपमध्ये काहीतरी वेगळं करत त्याला आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं होतं. हीच संधी घेरत हार्दिकने कमालीचा खेळ केला. हार्दिकने अखेरचं षटक उत्कृष्ट पद्धतीने टाकत टीकाकारांचे तोंडं बंद केली. अखेरच्या सामना झाल्यानंतर त्याने स्वता: ने आपल्या वाईट काळाविषयी सांगितलं. या सर्व कठीण परिस्थितीत असताना या खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं.

T20 World Cup Final: हार्दिक, विराट आणि रोहितसाठी अग्निपरीक्षापेक्षा कमी नव्हता अंतिम सामना; खेळाने दिलं टीकाकारांना उत्तर
Ind Vs SA: चॅम्पियन्स! आमच्या संघाने स्टाईलने विश्वकप आणला; टीम इंडियाचं पीएम मोदींकडून कौतुक, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com