Ind Vs SA: चॅम्पियन्स! आमच्या संघाने स्टाईलने विश्वकप आणला; टीम इंडियाचं पीएम मोदींकडून कौतुक, पाहा Video

PM Modi Praised Team India Video: भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसा येथे झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत विश्व कप घरी आणला. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलंय.
Ind Vs SA: चॅम्पियन्स! आमच्या संघाने स्टाईलने विश्वकप आणला; टीम इंडियाचं पीएम मोदींकडून कौतुक, पाहा Video
PM Modi Praised Team India Videogoogle
Published On

भारतीय संघाने १७ वर्षाचा दुष्काळ संपवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. आज शनिवार २९ जूनाचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. आज झालेल्या टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हा सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलाय. टीम इंडियाने तब्बल १७ वर्षांनंतर टी- २० विश्वचषक जिंकलाय. टीम इंडियाने यापूर्वी २०१३ मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.

भारतीय क्रिकेट संघाच हे यश पाहून पंतप्रधान मोदींनाही आनंद झालाय. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं. 'चॅम्पियन्स! आमच्या संघाने टी २० विश्वचषक स्टाईलने घरी आणला! भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक होता. या शानदार विजयाबद्दल सर्व देशवासियांकडून टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन.

आज १४० कोटी देशवासीयांना तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान वाटतोय. खेळाच्या मैदानावर तुम्ही विश्वचषक जिंकलात, पण भारतातील प्रत्येक गावात, गल्लीत आणि परिसरात तुम्ही लाखो देशवासीयांची मने जिंकलीत. ही स्पर्धा एका खास कारणासाठी लक्षात राहील. इतके अनेक संघ आणि तुम्ही एकही सामना गमावला नाही, ही काही छोटी कामगिरी नाहीये. तुम्ही क्रिकेट जगतातील प्रत्येक कौशल्य आणि चेंडू खेळलात आणि शानदार विजय मिळवला. यामुळे तुमचे मनोबल वाढले. मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर लिहिलीय.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय संघाचं कौतुक केलं असून त्यांनीही संघाचं कौतुक केलं आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन. आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या खेळाडूंनी संपूर्ण टी२० विश्वचषकात अतुलनीय सांघिक भावना आणि खिलाडूवृत्तीने चमकदार कामगिरी केली. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा देशाला अभिमान आहे. शाब्बास.'

दरम्यान, टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या होत्या. यात अक्षर पटेल धमाकेदार फलंदाजी आणि विराट कोहलीचं दमदार अर्धशतकाचा सामवेश आहे. भारतीय संघाने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या नाकीनऊ आले. बुमराह, अर्शदीप आणि हार्दिकच्या गोलंदाजीने आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

Ind Vs SA: चॅम्पियन्स! आमच्या संघाने स्टाईलने विश्वकप आणला; टीम इंडियाचं पीएम मोदींकडून कौतुक, पाहा Video
IND vs SA Final T20 World Cup: अंतिम सामन्यात भारताचा विजय होऊ दे! सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचला चाहता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com