T20 World Cup IND Vs SA: टॉस गेला की सामनाही गेला; असा रहिलाय टी२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा इतिहास

T20 World Cup 2024 IND Vs SA : आज रात्री भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामन्याचा थरार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलाय. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. या स्पर्धेत दोन्ही संघांनी एकही सामना गमावला नाहीये.
T20 World Cup: टॉस गेला की सामनाही गेला; असा रहिलाय टी२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा इतिहास
T20 World Cup 2024 IND Vs SASaam Tv

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिलेत. दोन्ही संघांनी विश्वचषक जिंकण्यासाठी पूर्ण तयारी केलीय. दोन्ही संघात विजय मिळण्याची क्षमता आहे. दोन्ही संघ एकमेकांना धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. पण टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा एक इतिहास राहिलाय.

ज्या संघाने टॉस गमावलाय त्या संघाला सामनाही गमवावा लागलाय. आतापर्यंत टी२० विश्वचषकाचे ८ अंतिम सामने खेळले गेलेत. यात ज्या संघाने नाणेफेक जिंकलीय. त्याच संघाने विजय मिळवलाय. यात फक्त एक सामना अपवाद राहिलाय. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये विजयाचा फॉर्म्युला काय राहिला ते पाहू.

टी-२० विश्वचषकाचा ९ वा सामना खेळला जात आहे. आतापर्यंत विश्वचषकाचे ८ फायनल सामने झालेत. यामध्ये फक्त एकदाच नाणेफेक हरलेला संघ विजेता ठरलाय. तर ७ वेळा नाणेफेक जिंकणारा संघच चॅम्पियन ठरलाय. अंतिम सामन्यात केवळ लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी होत असल्याचा इतिहास आहे. आकडेवारीनुसार गेल्या ८ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ६ वेळा सामना जिंकलाय. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ दोनदाच सामना जिंकलाय.

भारतविरुद्ध पाकिस्तान

२००७ मध्ये टी- २० वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळला गेला. या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताने २० षटकात ५ गडी गमावत १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १९.३ षटकांत सर्वबाद होत १५२ धावा करू शकला होता. भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित शर्माने १६ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी केली.

श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तान

T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सत्रात अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने २० षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा केल्या. पाकिस्तान संघाने १८.४ षटकात २ गडी गमावून १३९ धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना ८ गडी राखून जिंकून विश्वचषक जिंकला होता.

इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया

२०१० मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकचा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात ६ गडी गमावून १४७ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने १७ षटकांत ३ गडी गमावून १४८ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ७ गडी राखून जिंकून विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.

वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंका

२०१२ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेमध्ये झाला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ १८.४ षटकांत १०१ धावांत गारद झाला होता. वेस्ट इंडिजने हा सामना ३६ धावांनी जिंकून विश्वचषक जिंकला होता.

श्रीलंकाविरुद्ध भारत

२०१४ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ गडी गमावून १३० धावा केल्या होत्या. यामध्ये रोहित शर्माने २६ चेंडूत २९ आणि विराट कोहलीने ५८ चेंडूत ७७ धावा केल्या. दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने १७.५ षटकांत ४ गडी गमावून १३४ धावा केल्या. श्रीलंकेने हा सामना ६ गडी राखून जिंकला होता.

वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड

वेस्ट इंडिजने २०१६चा टी- २० विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ आमनेसामने आले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. इंग्लंडने २० षटकात ९ गडी गमावून १५५ धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना वेस्ट इंडिजने १९.४ षटकांत ६ गडी गमावून १६१ धावा केल्या आणि विश्वचषक जिंकला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड

यावर्षी झालेल्या टी२० च्या विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने २० षटकांत ४ गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ गडी गमावून १७३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना ८ गडी राखून जिंकला होता.

पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड

२०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झाला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने २० षटकात ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना इंग्लंडने १९ षटकांत ५ गडी गमावून १३८ धावा केल्या होत्या.

T20 World Cup: टॉस गेला की सामनाही गेला; असा रहिलाय टी२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा इतिहास
T20 world cup Final : रोहित शर्मा आणि विजयाची गॅरंटी; टी२० वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार, १० वर्षांतील रेकॉर्ड वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com