T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार, कोणत्या १५ खेळाडूंना संघात स्थान मिळणार?

Indian Cricket Team: टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये कोणते संभाव्य खेळाडू राहतील ते पाहू या.
T20 World Cup 2024
Indian Cricket TeamYandex
Published On

क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर आहे. आयसीसी (ICC) पुरुष T२० विश्वचषक २०२४ सुरु होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. आगामी T२० विश्वचषक १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय निवड समितीची बैठक या महिन्याच्या शेवटच्या तारखेला (३० एप्रिल) किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी होण्याची शक्यता आहे.

आयसीसीने T20 विश्वचषकासाठी संघ घोषित करण्यासाठी १ मे ही अंतिम मुदत दिली आहे. १ मेपर्यंत सर्व २० देशांना आपापले संघ निवडायचे आहेत. भारतीय चाहतेही आपल्या संघाची निवड होण्याची (Indian Cricket Team) आतुरतेने वाट पाहत आहेत. आज आपण कोणत्या खेळाडूंना T२० विश्वचषक २०२४ संधी मिळू शकते, हे जाणून घेऊ या.

कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma), माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि फलंदाज सूर्यकुमार यादव हे खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी संघात असण्याची दाट शक्यता (T20 World Cup 2024) वर्तविली जात आहे. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग यांनाही विश्वचषक खेळण्याची (Indian Cricket Team List BCCI) संधी मिळू शकते. जयस्वालने अलीकडच्या काळात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, तर रिंकू सिंगनेही फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे.

T२० विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य संघामध्ये कोणते खेळाडू राहतील ते पाहू या. संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे,(Cricket) हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र सिंह चहल, संजू सॅमसन , रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, हे खेळाडू संघामध्ये असू शकतात.

T20 World Cup 2024
Ranji Cricketers Salary: रणजी क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस! BCCI चा मास्टरप्लान तयार

यावेळी टी-२० विश्वचषक बाद फेरीसह एकूण ३ टप्प्यांत खेळला जाणार आहे. सर्व २० संघ प्रत्येकी ५ च्या ४ गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-८ मध्ये प्रवेश (Indian Cricket Team Update) करतील. यानंतर, सर्व ८ संघ प्रत्येकी ४ च्या २ गटात विभागले जातील. सुपर-८ टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.

T20 World Cup 2024
Former Rajasthan Cricketer Dies : राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन; क्रीडा विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com