Ranji Cricketers Salary: रणजी क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस! BCCI चा मास्टरप्लान तयार

Ranji Cricketers Salary News: क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं होतं. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी १५ लाख रुपयांची घोषणा केली होती.
bcci is planning to increase salary of ranji cricketers cricket news in marathi
bcci is planning to increase salary of ranji cricketers cricket news in marathi saam tv news

BCCI On Ranji Cricketers Salary:

क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं होतं. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी १५ लाख रुपयांची घोषणा केली होती. आता रणजी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. लवकरच रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनातही वाढ केली जाऊ शकते. बीसीसीआय लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते.

रणजी ट्रॉफी खेळणाऱ्यांना किती मानधन मिळतं?

सध्या रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रतिदिवस ४० ते ६० हजार रुपये दिले जातात. हे मानधन एका हंगामात किती सामने खेळणार आहे, यावर अवलंबून असतं. जर एखादा खेळाडू एका हंगामात साखळी फेरीतील ७ सामने खेळणार असेल तर त्याला वर्षाला ११.२ लाख रुपये मिळतात. तर आयपीएलचा एक हंगाम खेळून खेळाडू कोट्यवधींची कमाई करतात. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणं टाळतात. मात्र बीसीसीआय आता रणजी ट्रॉफीतील मानधनात भर घालण्याच्या विचारात आहे. (Cricket news in marathi)

bcci is planning to increase salary of ranji cricketers cricket news in marathi
GT vs MI, IPL 2024: मुंबई की गुजरात, कोण मारणार अहमदाबादचं मैदान? वाचा वेदर अन् पिच रिपोर्ट

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल २०२४ स्पर्धेत १५६ भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यापैकी ५६ खेळाडू असे आहेत, जे रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एकही सामना खेळले नव्हते. तर यापैकी २५ खेळाडू असे होते जे केवळ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. या सर्व गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयचा प्लान सुरु आहे. लवकरचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. बीसीसीआय मानधन वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार का? मानधन जर वाढलं, तर ते किती वाढेल? असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

bcci is planning to increase salary of ranji cricketers cricket news in marathi
KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com