GT vs MI, IPL 2024: मुंबई की गुजरात, कोण मारणार अहमदाबादचं मैदान? वाचा वेदर अन् पिच रिपोर्ट

GT vs MI,Weather Prediction And Match Datails: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे
IPL 2024 GT vs MI Weather prediction pitch reports match reports and playing XI prediction gujarat titans vs mumbai indians
IPL 2024 GT vs MI Weather prediction pitch reports match reports and playing XI prediction gujarat titans vs mumbai indians twitter

GT vs MI, Match Details Weather Prediction And Playing XI:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. गुजरातचा युवा शिलेदार शुभमन गिलसाठी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना असणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या देखील पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हे दोन्ही संघ गेल्या हंगामातील क्वालिफायरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली होती. या स्टेडियममध्ये एकूण ११ खेळपट्ट्या आहेत. असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा सामना हाय स्कोरिंग खेळपट्टीवर खेळवला जाऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

IPL 2024 GT vs MI Weather prediction pitch reports match reports and playing XI prediction gujarat titans vs mumbai indians
KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

कसं असेल हवामान?

सध्या अहमदाबादचं वातावरण उष्ण आहे. त्यामुळे पारा ३६ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. त्यावेळी तापमान ३० डिग्री सेल्सिअस इतकं असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Cricket news in marathi)

IPL 2024 GT vs MI Weather prediction pitch reports match reports and playing XI prediction gujarat titans vs mumbai indians
Fine On Harshit Rana: 'प्लाइंग किस' सेलिब्रेशन गोलंदाजाला भोवलं! हर्षित राणावर IPL ची मोठी कारवाई

असे आहेत दोन्ही संघ..

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्ज़ी, टिम डेविड, श्रेयस गोपाल, ईशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी. शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णु विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड आणि सूर्यकुमार यादव

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, स्पेंसर जॉनसन, कार्तिक त्यागी, जोशूआ लिटिल, अभिनव मनोहर, डेविड मिलर, सुशांत मिश्रा, दर्शन नालकंडे, नूर अहमद, राशिद खान, रिद्धिमान साहा, साई किशोर, साई सुदर्शन, एम शाहरुख खान, विजय शंकर, बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुथार, राहुल तेवतिया, मॅथ्यु वेड, केन विल्यम्सन, जयंत यादव, उमेश यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com