Fine On Harshit Rana: 'प्लाइंग किस' सेलिब्रेशन गोलंदाजाला भोवलं! हर्षित राणावर IPL ची मोठी कारवाई

Harshit Rana Flying Kiss Celebration: मयांक अगरवालला बाद केल्यानंतर फ्लाइंग किस सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन त्याला चांगलच महागात पडलं आहे.
harshit rana fined by ipl for breaching the code of conduct after flying Kiss celebration amd2000
harshit rana fined by ipl for breaching the code of conduct after flying Kiss celebration amd2000twitter
Published On

Fine On Harshit Rana, KKR vs SRH IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील दुसऱ्याच दिवशी क्रिकेट चाहत्यांना काळजाचा ठोका वाढवणारा सामना पाहायला मिळाला. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ धावांनी विजय मिळवला.

हा विजय मिळवून देण्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाज हर्षित राणाने शानदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान त्याने मयांक अगरवालला बाद केल्यानंतर फ्लाइंग किस सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन त्याला चांगलच महागात पडलं आहे.

हर्षित राणावर मोठी कारवाई...

हर्षित राणाने या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्या मॅच फीवर ६० टक्के दंड आकारण्यात आला आहे. या सामन्यात त्याने मयांक अगरवाल आणि हेनरिक क्लासेनला बाद करत माघारी धाडलं. या दोघांना बाद केल्यानंतर त्याने उत्साहाच्या भरात सेलिब्रेशन केलं.

harshit rana fined by ipl for breaching the code of conduct after flying Kiss celebration amd2000
KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

त्याने मयांक अगरवालला बाद केल्यानंतर प्लाइंग किस दिली. तर क्लासेनला बाद केल्यानंतरही हर्षित उत्साहाच्या भरात सेलिब्रेशन केलं. हे हेनरिक क्लासेनला अजिबात आवडलं नाही. तो मैदानाच्या बाहेर जात असताना हर्षितला काहीतरी बोलताना दिसून आला. क्लासेन त्याच्या दिशेने जात होता. इतक्यात श्रेयस अय्यर मध्यस्थी करताना दिसून आला. (Cricket news in marathi)

harshit rana fined by ipl for breaching the code of conduct after flying Kiss celebration amd2000
IPL 2024: IPL च्या पहिल्याच सामन्यात वाद! विराटकडून रचिनला शिवीगाळ? Video तुफान व्हायरल

आयपीएलने प्रेस रिलीज शेअर केली आहे ज्यात हर्षित राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत दोन लेव्हन १ चं उल्लंघन केलं आहे. त्यासाठी त्याच्यावर अनुक्रमे १० आणि ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हर्षित राणानेही आपली चूक मान्य केली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली.

तर फिल सॉल्टने ५४ धावा केल्या. या खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २०८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com