आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही.
तो १९ चेंडूत २१ धावा करत माघारी परतला. फलंदाजीत त्याची जादू पाहायला मिळाली नाही. मात्र मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना त्याचं रौद्ररुप पाहायला मिळालं आहे. ज्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराटने लाईव्ह सामन्यात केली शिवीगाळ?
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रचिन रविंद्र चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने आपली छाप सोडली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. शानदार सुरुवात मिळाली असताना अनुभवी फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने त्याला ३७ धावांवर बाद करत माघारी धाडलं. (Cricket news in marathi)
रचिन रविंद्र (Rachin Ravindra) बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) रुद्रावतार पाहायला मिळाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना तो बाद होऊन मैदानाबाहेर जात असलेल्या रचिन रविंद्रला बाहेर जाण्याचा इशारा करताना दिसून आला. ज्याप्रकारे त्याने इशारा केला त्यावरुन असं वाटत होतं की, विराटने अपशब्दांचा वापर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अनुज रावतने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने ३८ धावा केल्या. या धावांच्या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २० षटकअखेर १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८.४ षटकात आव्हान पूर्ण केलं आणि हा सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.