Faf Du Plessis Statement: हातचा सामना निसटल्यानंतर फाफ ड्युप्लेसिस या खेळाडूवर भडकला, पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
faf du plessis statement after defeat against csk in csk vs rcb 1st match in ipl 2024
faf du plessis statement after defeat against csk in csk vs rcb 1st match in ipl 2024 twitter
Published On

CSK vs RCB, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नईने शानदार कामगिरी करत बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ मे २००८ रोजी चेन्नईला चेपॉकमध्ये हरवलं होतं. त्यानंतर आता १६ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करू शकलेला नाही. हे दोन्ही संघ चेपॉकच्या मैदानावर ८ वेळेस आमने सामने आले आहेत. या आठही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने मैदान मारलं आहे.

फाफ डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करतोय. या संघाला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडून पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. डू प्लेसिसच्या मते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५-२० धावा कमी केल्या. तो म्हणाला की, ' सुरुवातीच्या ६ षटकात वेगाने धावा करणं महत्वाचं होतं. चेन्नईचे फिरकी गोलंदाज दबाव बनवून ठेवतात. आम्ही सुरुवातीच्या ६ षटकात विकेट्स गमावल्या. या खेळपट्टीवर आम्ही १५-२० धावा कमी केल्या. ही खेळपट्टी इतकी खराब नव्हती जितका खराब खेळ आम्ही केला.' (Cricket news in marathi)

faf du plessis statement after defeat against csk in csk vs rcb 1st match in ipl 2024
IPL 2024 Winner Prediction: यंदा हाच संघ उंचावणार IPL ची ट्रॉफी! पहिल्या सामन्यापूर्वीच ब्रेट लीची मोठी भविष्यवाणी

चेन्नईकडून मुस्तफिजूर चमकला..

चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुस्तफिजूर रहमान चमकला. प्रथम गोलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्याने एकापाठोपाठ एक विकेट्स काढून दिल्या. आपल्या स्पेलमध्ये त्याने केवळ २४ धावा खर्च केल्या. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अनुज रावतने ४८ आणि दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावांची खेळी करून ९५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७३ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

faf du plessis statement after defeat against csk in csk vs rcb 1st match in ipl 2024
IPL 2024: पहिल्यांदाच दिव्यांगानाही घेता येणार IPL ची मजा! जाणून घ्या कशी

चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७४ धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी १८.४ षटकात १७६ धावा करत हा सामना जिंकला. चेन्नईकडून फलंदाजी करताना शिवम दुबेने ३४ धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने २५ धावा केल्या. या दोघांनी मिळून ६६ धावा जोडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com