CSK vs RCB : शिवम आणि जडेजाची तडाखेबाज फलंदाजी; चेन्नईने बेंगळुरूविरुद्ध १७ व्या हंगामाचा पहिला सामना घातला खिशात

CSK vs RCB IPL Match : आरसीबीने दिलेल्या धावांचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. चेन्नईने सहा गडी राखून आरसीबीवर विजय मिळवला.
CSK vs RCB IPL Match :
CSK vs RCB IPL Match : Saam tv
Published On

CSK vs RCB IPL Match :

आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. आयपीएल २०२४ मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु या दोन्ही संघात सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्सला १७४ धावांचं आव्हान दिलं. आरसीबीने दिलेल्या धावांचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. चेन्नईने सहा गडी राखून आरसीबीवर विजय मिळवला. (Latest Marathi News)

आरसीबीने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने १५ धावा कुटल्या. ऋतुराजने या डावात तीन चौकार लगावले. त्यानंतर चौथ्या षटकात यश दयाल तंबूत परतला. पुढे रचिन रवींद्रने १५ चेंडूत ३७ धावा कुटल्या. त्याने या डावात ३ चौकार आणि तीन षटकार लगावले. सातव्या षटकात रचिन बाद झाला.

CSK vs RCB IPL Match :
Ajinkya Rahane Catch Video : जबरदस्त! आरसीबीविरुद्ध सामन्यात अंजिक्य रहाणेने घेतली विराटची अफलातून कॅच

रचिनला कर्ण शर्माला बाद केलं. त्यानंतर अंजिक्य रहाणे ११ व्या षटकात बाद झाला. अंजिक्य रहाणेने १९ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. ग्रीनने रहाणेला बाद केलं. पुढे ग्रीनने १३ व्या षटकात डेरिल मिचेलला बाद केले. डेरिलने १८ चेंडूत २२ धावा कुटल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने तडाखेबाज खेळ दाखवला. दोघांच्या दमदार खेळीने चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने धूळ चारली.

आरसीबीच्या रावत आणि कार्तिकने डाव सावरला

आरसीबीने २० षटकात ६ गडी गमावून १७३ धावा कुटल्या. आरसीबीसाठी मुस्तफिजुर रहमानने ४ गडी बाद केले. आरसीबीचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९५ धावांची भागीदारी रचली. शेवटच्या चेंडूपर्यंत दोघांनी भागीदारी कायम ठेवली.

CSK vs RCB IPL Match :
Virat kohli Record: पहिल्याच सामन्यात विराटला इतिहास रचण्याची संधी! १ धाव करताच मोडणार IPL स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

आरसीबीचा कर्णधार फाफने २० चेंडूत ३५ धावा कुटल्या. विराट कोहलीने २० चेंडूत २१ धावा कुटल्या. फाफ आणि विराटने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. रजत पाटीदार शुन्यावर बाद झाला.

दीपक चहरने सहाव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. १२ व्या षटकात विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन बाद झाले. आरसीबीने ७८ धावांवर पाच गडी गमावले होते. त्यानंतरप रावत आणि कार्तिकने संघाचा डाव सावरला. या दोघांच्या जीवावर आरसीबीने १७४ धावांचं आव्हान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com