Rachin Ravindra Name Fact Check: रचिनच्या नावाचा अन् सचिन- द्रविडचा काहीच संबंध नाही.. वडिलांनी सांगितली खरी स्टोरी

Rachin Ravindra Name Story: रचिनच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे.
rachin ravindra
rachin ravindrasaam tv news

Rachin Ravindra Name Fact Check:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय वंशाच्या युवा खेळाडूने धुमाकूळ घातला आहे. पहिलीच वर्ल्डकप स्पर्धा, ९ सामन्यांमध्ये ७०.६२ च्या सरासरीने ५६५ धावा, ३ शतकं आणि २ अर्धशतकं. ही भूवया उंचवायला भाग पाडणारी आकडेवारी पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, आम्ही कोणाबद्दल बोलतोय.

तर आम्ही बोलतोय न्यूझीलंडचा युवा स्टार फलंदाज रचिन रविंद्र बद्दल. त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे.

रचिन हे नाव कसं पडलं?

न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात रचिनचाही मोलाचा वाटा राहिला आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिलाच सामना, इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आमने सामने होते. इंग्लंडने २८३ धावांचं आव्हान दिलं.

या धावांचा पाठलाग करताना रचिनने गोलंदाजीत १ विकेट तर फलंदाजीत १२३ धावा चोपल्या. या मास्टरक्लास कामगिरीनंतर चर्चा रंगली ती रचिनच्या नावाची.

अनेकांचं असं म्हणणं होतं की, रचिनचे वडील राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरचे फॅन होते. त्यामुळे त्याचं नाव रचिन असं ठेण्यात आलं होतं. मात्र आता त्याचे वडील रवी कृष्णमुर्ती यांनी त्याच्या नावामागील खरी स्टोरी सांगितली आहे. (Latest sports udpates)

rachin ravindra
IND vs NZ: 'आम्हाला हे मान्य करावं लागेल..', न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविडचं मोठं विधान

रवी कृष्णमुर्ती यांनी 'द प्रिंट'शी बोलताना रचिनच्या नावामागची खरी स्टोरी सांगितली आहे. त्यांनी किस्सा सांगताना म्हटले की,'ज्यावेळी रचिनचा जन्म झाला त्यावेळी माझ्या पत्नीने हे नाव सुचवलं होतं. या नावावर आम्ही दिर्घकाळ चर्चाही केली नाही. नाव सोपं होतं आणि स्पेलिंगही सोपं होतं. म्हणून आम्ही हे नाव ठेवलं. त्याचं हे नाव सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविडच्या नावासोबत जुळतंय, हे आम्हाला नंतर कळलं. त्याने पुढे जाऊन क्रिकेटपटू व्हावं या उद्देशाने आम्ही हे नाव ठेवलं नव्हतं.'

रचिनचा दमदार खेळ

रचिन आपली पहिलीच वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या स्पर्धेतही फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने आतापर्यंत २१ वनडे, ३ कसोटी आणि १८ टी -२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

rachin ravindra
World cup 2023: IND vs NZ सामन्यासाठी ICC कडून सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर; 2019 WC सेमी फायनलच्या अंपायरचाही समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com