क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यत पोहचली आहे. बुधवारी (१५ नोव्हेंबर) या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
भारतीय संघाने २०११ मध्ये वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. मात्र त्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडला पराभूत करावं लागणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे.
राहुल द्रविड यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,' हा फक्त एक सामना आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असं मला वाटतं. कारण हा सेमीफायनलचा सामना आहे, त्यामुळे हा सामना खुप महत्वाचा आहे. आमची विचारप्रणाली या सामन्यातही बदलणार नाहीये. हा सेमीफायनलचा सामना आहे. आम्हाला मान्य करावं लागेल की, सेमीफायनलचा दबाव असतोच. चांगली तयारी करुन मैदानात उतरणं हे आमच्या हातात आहे आणि आम्ही तेच करतोय.'
तसेच श्रेयस अय्यरचं कौतुक करत राहुल द्रविड म्हणाले की,' श्रेयस अय्यर हा आमच्या संघातील मिडल ऑर्डरचा पाठीचा कणा आहे. गेल्या १० वर्षांपासुन आम्ही चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाजाचा शोध घेत होतो. हे आमच्यासाठी खुप कठीण राहिलं आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.