Rachin Ravindra : माझ्या नातवाला कुणाची नजर न लागो; रचिन रवींद्रची आजीने काढली दृष्ट, VIDEO Viral

Rachin Ravindra Grandmother Video Viral : श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रचिन रवींद्र बेंगळुरूमध्ये आजोबांच्या घरी पोहोचला. तेथील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Rachin Ravindra
Rachin RavindraSaam TV
Published On

Rachin Ravindra Video Viral :

भारतात सुरु असलेल्या वर्ल्डकमध्ये टीम इंडिया जोमात आहे. टीम इंडियासह आणखी एक नाव या वर्ल्डकपमध्ये चर्चेत आहे. भारतीय वंशांचा  न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रचं नाव सध्या सर्वांच्या तोंडी आहे. रचिनने दर्जा बॅटिंग करत अनेक दिग्गजांसोबत आपलं नाव जोडलं आहे.

श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रचिन रवींद्र बेंगळुरूमध्ये आपल्या आजोबांच्या घरी पोहोचला. तेथील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रचिनच्या आजीचा हा व्हिडीओ आहे. आजी आणि नातवाच्या हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. (Latest News)

रचिनचे आजी-आजोबा शिक्षक होते. त्याच्या आजोबांचे नाव बाळकृष्ण अडिगा आणि आजीचे नाव पौर्णिमा आहे. दोघेही दक्षिण बेंगळुरूमध्ये राहतात. नातू घरी आल्यानंतर आजी पौर्णिमा यांनी काळजीपोटी सर्वप्रथम रचिनची नजर काढली. रचिन सध्याच्या वर्ल्डकपमध्ये चर्चेचा विषय आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव आहे.

त्यामुळे त्याच्या आजीने काळजीपोटी त्याची दृष्ट काढली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून आजी-नातवाच्या नात्यातील ओलावा दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rachin Ravindra
World Cup 2023: लंकेच्या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघासाठी सेमिफायनलचे दरवाजे उघडले

भारतीय वंशाच्या रचिनचा जन्म न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे झाला. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती हे व्यवसायाने सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्यापूर्वी भारतातील त्यांच्या मूळ गाव बेंगळुरूमध्ये त्यांनी भरपूर क्रिकेट खेळले. रचिनने भारतात क्रिकेट स्किल्स शिकले, येथे प्रशिक्षण घेतले. फिरकीचे बारकावेही शिकले. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन भारतीय क्रिकेट दिग्गजांना नावावरुन त्याच्या वडिलांनी त्याचं नाव रचिन ठेवले आहे.

विश्वचषकात पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

रचिन पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक 565 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचा विक्रम मोडला. बेअरस्टोने 2019 च्या पदार्पणाच्या विश्वचषकात 532 धावा केल्या होत्या.एवढेच नाही तर तो 2023च्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. रचिनने 9 सामन्यांनंतर 565 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला (550 धावा) मागे सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com