World Cup 2023: लंकेच्या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघासाठी सेमिफायनलचे दरवाजे उघडले

World Cup 2023 NZ vs SL : न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला असून न्यूझीलंडला दोन पाईंट्स मिळाले आहेत.
World Cup
World Cup Twitter

World Cup 2023 NZ vs SL New Zealand Won :

आपल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना फायद्याचा ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला १७१ धावांत बाद केलं. न्यूझीलंडच्या राचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडचा विजय सोपा केला. (Latest News)

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर न्युझीलंड आणि श्रीलंकेच्या संघात साखळी फेरीतील त्यांचा अखेरचा सामना झाला. न्यूझीलंडने या सामन्यात टॉस जिंकत मोठा गेम केला. कारण टॉस जिंकत त्यांनी धावांचा पाठलाग करण्याचे ठरवले आणि ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. हा सामना न्युझीलंडने ५ विकेट राखत जिंकला आणि सेमिफायनलचा प्रवेश निश्चित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाचा सलामीवीर कुसल परेरा याने ५१ धावांची खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शेवटच्या फलंदाजांनी थोडाफार संघर्ष करत श्रीलंकेला दीडशे पार पोहोचवले. महिश थिक्षणा व मदुशंका यांनी अखेरच्या विकेटसाठी ४३ धावा केल्या. परंतु लंकेचा संघ २०० पार धावा करू शकला नाही. त्यांचा डाव १७१ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड गोलंदाज ट्रेट बोल्ट याने सर्वाधिक ३ बळी घेतले.

तर श्रीलंकेने दिलेल्या १७२ धावांचं आव्हान पार करताना न्यूझीलंडची देखील पडझड झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांन चांगली सुरूवात करून दिली खरी. मात्र दोघांनाही अर्धशतक करता आले नाही. मिशेलने ४३ धावा केल्या. तर कर्णधार केन विल्यमसन फक्त १४ धावा करू शकला. त्यानंतर उरलेल्या फलंदाजांनी खेळ संपवला.

World Cup
Angelo Mathews: शाकिबला श्रीलंकेत पाय ठेऊ देणार नाही, अन्यथा दगडफेक करु; संतापलेल्या मॅथ्यूजच्या भावाचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com