Virat Kohli Six Video: विराट कोहलीचा पुन्हा अविश्वसनीय षटकार! पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले

LSG vs RCB, Virat Kohli Six : बंगळुरूमध्ये 96 धावांच्या स्कोअरवर कोहली बाद झाला. त्याने 44 चेंडूत 4 चौकार आणि तब्बल षटकार ठोकले आणि 61 धावांची शानदार खेळी खेळली.
Virat Kohli Hits  incredible six on Mark Wood's 148.9 Kmph ball
Virat Kohli Hits incredible six on Mark Wood's 148.9 Kmph ballsaam tv
Published On

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात सोमवारी, बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून लखनऊने बंगळुरूला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. यानंतर आरसीबीने जबरदस्त खेळी खरत लखनऊला 212 धावांचे लक्ष्य दिले आहे. आरसीबीकडून विराट कोहली, फाप डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जबरदस्त अर्धशतकी खेळी केली.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटने मैदानात येताच आग ओकायला सुरुवात केली. या सामन्यात कोहलीने जबरदस्त अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने मार्क वुडच्या वेगवान चेंडूवर असा गगनचुंबी षटकार मारला की सगळेच अवाक् झाले. किंग कोहलीचा हा सिक्सर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Virat Kohli Hits  incredible six on Mark Wood's 148.9 Kmph ball
LSG vs RCB: विराट, डुप्लेसी आणि मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी, आरसीबीने उभारला 212 धावांचा डोंगर

विराट कोहलीने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाटी आलेल्या मार्क वुडने तिसरा चेंडू 148.9 किमी प्रतितास वेगाने टाकला आणि कोहलीने तो लाँग ऑनला मिडविकेटच्या वरून षटकार लगावला. यापूर्वी त्याने दुसऱ्या चेंडूवर चौकारही मारला होता. वुडने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूच्या वेगाचा कोहलीवर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने शानदार षटकार ठोकला.

Virat Kohli Hits  incredible six on Mark Wood's 148.9 Kmph ball
Tushar Deshpande On Fake News: रोहित शर्माबद्दलच्या वक्तव्यावर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडेचा मोठा खुलासा, म्हणाला....

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बंगळुरू संघाने सामन्यात शानदार सुरुवात केली. विराटने आयपीएल २०२३ मध्ये तिसरे अर्धशतक झळकावले. कोहलीने 35 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने या मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रवी बिश्नोईच्या चेंडूवर लाँग अॅट सिंगल घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. बंगळुरूमध्ये 96 धावांच्या स्कोअरवर कोहली बाद झाला. त्याने 44 चेंडूत 4 चौकार आणि तब्बल षटकार ठोकले आणि 61 धावांची शानदार खेळी खेळली. (Latest Sports News)

या कामगिरीसह विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सर्व संघांविरुद्ध अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. अशी कामगिरी करणारा तो आता दुसरा खेळाडू ठरला आहे. किंग कोहलीचे आयपीएल 2023 मधील तीन डावातील हे दुसरे अर्धशतक आहे. कोहलीव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड हा सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com