England vs South Africa World Cup Match:
विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंडचा जबरदस्त सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल २२९ धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७० गारद झाला. यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने २२९ धावांच्या फरकाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. (Latest Marathi News)
इंग्लंडने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ गडी गमावून ३९९ धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने सर्वाधिक १०९ धावा कुटल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झालेली दिसून आली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही इंग्लंड संघावर दबाव निर्माण केला. इंग्लंडचे ६ षटकतच ३ गडी तंबूत परतले. जॉनी बेयरस्टो, एनगिडी, जो रुट हे तिन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मार्को यानसेनने इंग्लंडला दोन धक्के दिले.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लिश फलंदाजांची कंबर मोडली. इंग्लंडचा कर्णधार बटलर देखील स्वस्तात माघारी परतला. बटलरनंतर हॅरी देखील लवकर बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाजही लवकर बाद झाले. तर शेवटचा फलंदाज रीस टॉपली दुखापतग्रस्त झाल्याने मैदानावर उतरला नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघाने इंग्लंड संघावर २२९ धावांनी सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.