NED vs SL : लंकेच्या शिलेदारांनी 'ऑरेंज टीम' नेदरलँडला नमवलं; ५ विकेट राखत श्रीलंकेचा विजय

Cricket World Cup 2023 : श्रीलंकेने ५ गडी राखत नेदरलँड्सचा पराभव केला.
Cricket World Cup
Cricket World Cup Social media
Published On

Cricket World Cup 2023 NED vs SL :

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपमधील १९ वा सामना नेदरलँड्स आणि श्रीलंकेमध्ये झाला. हा सामना श्रीलंकेने जिंकला. वर्ल्डकपमध्ये सलग तीन पराभवानंतर श्रीलंकेने विजयी फतका फडकवली आहे. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने श्रीलंकेसमोर २६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नेदरलँडचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतलेल्या श्रीलंकेच्या संघाने ४८.२ षटकांत २६३ धावा करत सामना जिंकला. गेल्या चार सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिलाच विजय आहे.(Latest News)

सदीरा-निसांकाने जिंकवला सामना

नेदरलँडने दिलेल्या धावांचे आव्हान पार करताना लंकेला धक्के लवकर मिळाले. कुसल परेरा १८ धावांवर तर कुसल मेंडिस अवघ्या ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर पथुम निसांका ५४ धावांची खेळी केली त्याला साथ दिली सदीरा समाराविक्रमाने या दोघांच्या शानदार खेळीमुळे नेदरलँडच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. सदीराने ७ चौकार लगावत ९१ धावा केल्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेदरलँडच्या संघाने ४९.४ षटकात सर्व गडी गमावत २६२ धावा करत लंकेसमोर २६३ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. नेदरलँडचं हे आव्हान श्रीलंकेने ५ गडी गमावत पूर्ण केलं. दरम्यान नेदरलँडची फलंदाजी सुरुवातीला खूप खराब राहिली. ऑरेंज टीम नेदरलँडची संघाने आपल्या ६ गडी अवघ्या ९१ धावांवर गमावले होते, तरीही नेदरलँडने वर्ल्डकपच्या इतिहासातील चौथी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

दरम्यान श्रीलंकेच्या दिलशान मधुशंका आणि रजिताने नेदरलँड्सच्या फलंदाजांचे हात खोलू दिले नाही. या दोघांनी ४-४ गडी बाद केले. मधुशंकाने ९,४ षटकात ४९ धावा दिल्या. तर रजिताने ९ षटकात ५० धावा दिल्या. याशिवाय महेश टीक्षानाने एक गडी बाद केला. नेदरलँड्ससाठी एंजेलब्रँडने सर्वाधिक ७० धावा केल्या. यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तर व्हॅन विकने ७५ चेंडूत ५९ धावा केल्या. यासह अकरमनने २९ धावा करत नेदरलँडच्या संघाची धावसंख्या २६२ पर्यंत नेली.

Cricket World Cup
World Cup: सामना जिंकूनही रोहित शर्मा चिंतेत; सामन्यानंतर हार्दिकच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com