World Cup: सामना जिंकूनही रोहित शर्मा चिंतेत; सामन्यानंतर हार्दिकच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

World Cup2023 : टीम इंडियाने बांगलादेशावर मोठा विजय मिळवलाय. परंतु कर्णधार रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत चिंतेत आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaTwitter (X) Saam Tv
Published On

Rohit Sharma On Hardik Pandya Injury :

विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशवर मोठा विजय साकारला. या वर्ल्डकपमधील भारताचा चौथा विजय ठरला. इतका मोठा विजय मिळाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा मात्र चिंतेत पडला आहे. हिटमॅन रोहितची चिंता खेळाविषयी नाही परंतु भारताचा ऑलराउंडर हार्दिकविषयी आहे. (Latest News)

हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. हार्दिक फलंदाजीसोबत गोलंदाजीत ६वा पर्याय म्हणून संघासाठी उपयोगी पडतो. या वर्ल्डकपमध्ये त्याने पहिल्या ३ सामन्यात १६ ओव्हरमध्ये ५ विकेट घेतल्या आहेत. संघात शार्दूल सारखा जलद गोलंदाज असताना रोहित शर्माने त्याला फक्त ८ षटक टाकू दिले. यावरून रोहित शार्दूल ठाकूर पेक्षा हार्दिकवर अधिक अवलंबून आहे हे लक्षात येते. याचमुळे कर्णधार रोहित शर्मा हा हार्दिकच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित अँड कंपनीने ७ विकेट राखत विजय मिळवला आहे. बांगलादेशच्या २५७ धावांचा पाठलाग करताना भारताने ४२ व्या ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करत विजय साकारला. दरम्यान या विजयाआधी भारताच्या खात्यामध्ये ६ गुण होते. आता भारतीय संघाचे ८ गुण झाले आहेत. सर्व गणित ठीक असले तरी खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता वाढत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना संघाचा उपकर्णधार आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला दुखापत झाली.

हार्दिकची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चालता देखील येत नव्हते. यामुळे पुढील सामन्यात हार्दिक असेल नाही हा प्रश्न अनेकांना पडलाय. दरम्यान सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर भाष्य केलं. उद्या त्याची अवस्था कशी असेल यावर पुढील योजना आखल्या जातील. परिषदेत बोलाताना रोहित म्हणाला की, हा एक चांगला विजय होता. अशा विजयाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.

आमची सुरूवात चांगली झाली नाही, पण आमच्या खेळाडूंनी मधल्या षटकांमध्ये आणि बॅक-एंडला परत वरती आणलं. या सर्व सामन्यांमध्ये आमची क्षेत्ररक्षण शानदार राहिली आहे. ते तुमच्या नियंत्रणात आहे, तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करू शकता. आमच्या गोलंदाजांनीही त्यांची कामगिरी चांगली केली. कोणत्या बाजुला चेंडू टाकायचा हे त्यांना कळलं होतं. जड्डू हा गोलंदाजी करण्यात आणि झेल घेण्यात हुशार आहे. आम्ही एक गट म्हणून चांगली कामगिरी करत आहोत.

सर्व कामगिरीसाठी नक्कीच पदक जाऊ शकतं. जे प्रत्येकाला चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करते. याचदरम्यान रोहितने हार्दिकच्या दुखापतीची माहिती दिली. रोहित म्हणाला की, गोलंदाजी करताना त्याला नक्कीच त्रास झाला. परंतु त्यांची दुखापत खूपच गंभीर नाहीये. उद्या सकाळी त्याची स्थिती पाहू त्यानंतर पुढे कसे नियोजन करायचे हे ठरू.

Hardik Pandya
IND Vs PAK World Cup: 'कुंग फू' पांड्या झाला 'मांत्रिक' पांड्या; इमामच्या विकेट घेण्याआधी चेंडूसोबत पुटपुटला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com