बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेला सामना ऐतिहासिक सामना ठरला आहे. कारण या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होऊन माघारी परतल. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
तो ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावरुन क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणावर अँजेलो मॅथ्यूजच्या भावाने धक्कदायक प्रतिक्रिया दिली आहे.
नेमंक काय घडलं?
तर झाले असे की, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु होता. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने सदीरा समरविक्रमाला बाद केलं. समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजी करण्यासाठी आला होता.पहिल्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी त्याच्या हेल्मेटचा बेल्ट तुटला.
या कारणामुळे त्याला पहिला चेंडू खेळण्यास उशीर झाला.त्यावेळी शाकिब अल हसनने अंपायरकडे टाईम आऊटची अपील केली. अंपायरने त्याला बाद घोषित केलं. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा जगातील पहिलाच फंलदाज ठरला. दरम्यान या विकेटनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)
या प्रकरणावर क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.मात्र अँजेलो मॅथ्यूजच्या भावाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे
'जे झालं ते अतिशय निंदनीय होतं. यापुढे आम्ही शाकिबचं श्रीलंकेत स्वागत करणार नाही. तो यापुढे श्रीलंकेत किंवा लंका प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी आला तर त्याच्यावर दगडफेक करु.'
शाकिब अल हसनला जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी तो म्हणाला होता की, 'आमच्या संघातील खेळाडूने मला सुचवलं की, जर मी अपील केली तर मॅथ्यूज आऊट होऊ शकतो. तेव्हा मी अंपायरला सांगितलं. त्यांनी आम्हाला म्हटलं की, तुम्हाला अपील करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर तो आऊट असेल तर मी अपील करेलच. हे चूक होतं की बरोबर मला माहीत नाही. पण हे जर नियमात बसत असेल तर मी नक्कीच अपील करेल.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.