World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत बुमराहचीच हवा! या रेकॉर्डमध्ये सर्वच गोलंदाजांना सोडलंय मागे

Jasprit Bumrah News: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत जसप्रीत बुमराहची हवा पाहायला मिळाली आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahtwitter
Published On

Jasprit Bumrah News:

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह भारतीय संघ वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाच्या मागे फलंदाजांसह गोलंदाजांचाही तितकाच मोलाचा वाटा राहीला आहे.

भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या जागी एका खास विक्रमाच्या नोंद झाली आहे.

जसप्रीत बुमराहची दहशत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही कायम आहे. बुमराहने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत २६८ डॉट बॉल्स टाकले आहेत. त्याची डॉट बॉल टाकण्याची सरासरी ही ७० टक्के इतकी आहे.

आर्यन दत्त या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आर्यनने आतापर्यंत ५८.४ टक्के डॉट बॉल टाकले आहेत. त्याने २४७ डॉट बॉल टाकले आहेत. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. ट्रेंट बोल्टने या स्पर्धेत आतापर्यंत ५७.५ टक्के डॉट बॉल टाकले आहे. मार्को यान्सेन या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २४४ डॉट बॉल टाकले आहेत.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत दिलशान मदुशंका अव्वल स्थानी आहे. मदुशंकाने ८ सामन्यांमध्ये २१ गडी बाद केले आहेत. तर अॅडम झाम्पाय या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

त्याने ८ सामन्यांमध्ये २० गडी बाद केले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या यादीत चौथ्या स्थानी आहे. शमीने अवघ्या ४ सामन्यांमध्ये १६ गडी बाद केले आहेत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

jasprit bumrah
World Cup 2023: न्यूझीलंड,पाकिस्तान की अफगाणिस्तान? टीम इंडियासोबत सेमीफायनलमध्ये कोण भिडणार? वाचा समीकरण

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर ,विराट कोहलीने ८ सामन्यांमध्ये ५४३ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. तर ५५० धावा करणारा क्विंटन डी कॉक या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ५२३ धावांसह रचिन रविंद्र या यादीत अव्वल स्थानी आहे.

jasprit bumrah
World Cup Semi Final: टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठीकाण बदलणार! समोर आलं मोठं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com