Sourav Ganguly : 'टीम इंडिया आणखी एक वर्ल्डकप फायनल हरला तर रोहित समुद्रात उडी मारेल'; दिग्गज क्रिकेटरचं विधान

Sourav Ganguly On Rohit Sharma: संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याच्या कर्णधारपदाची मोठी भूमिका असते. ही भूमिका रोहित शर्माने चांगली निभावलीय. आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना सुरू आहे, त्याचदरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठं विधान केलं आहे.
Sourav Ganguly : 'टीम इंडिया आणखी एक वर्ल्डकप फायनल हरला तर रोहित समुद्रात उडी मारेल'; दिग्गज क्रिकेटरचं विधान
Sourav Ganguly On Rohit SharmaGoogle
Published On

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळतोय. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत आपले सर्व सामने जिंकलेत. तर आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियापेक्षा एक सामना जास्त जिंकलाय. दरम्यान आजच्या अंतिम सामन्याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय कर्णधाराविषयी मोठं विधान केलं. रोहित शर्माने संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. भारतीय संघाने टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे भारतीय संघ अंतिम सामना खेळतोय. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जागतिक विजेतेपदाचा दुष्काळ या संघाला संपवायचा आहे. याचदम्यान सौरभ गांगुलीने भारतीय संघाच्या अंतिम सामन्याविषयी मोठं विधान केलंय. सौरभ गांगुलीने पीटीआयशी बोलतांना सांगितले की, "मला वाटत नाही की रोहित शर्मा सात महिन्यांत दोन विश्वचषक फायनलाचा सामना गमावेल."

सात महिन्यांत त्याच्या कर्णधारपदाखाली दोन फायनल हरल्यास, रोहित कदाचित बार्बाडोसच्या समुद्रात उडी घे घेईल. रोहितनं आतापर्यंतच्या सामन्यात शानदार फलंदाजी केलीय. मला आशा आहे की, भारत विजेतेपदासह मोहीम पूर्ण करेल, अशी आशा आहे. संघाने न घाबरता खेळावं. रोहितने दोन वेळा विश्वचषकाची फायनल खेळली आहे. येथील संघाची मोहीम आतापर्यंत अपराजित राहिली आहे. यावरून त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. त्याच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही, कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो कर्णधार झाला होता, अशं गांगुली म्हणाला. दरम्यान भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र सुरुवात खराब राहिलीय.

Sourav Ganguly : 'टीम इंडिया आणखी एक वर्ल्डकप फायनल हरला तर रोहित समुद्रात उडी मारेल'; दिग्गज क्रिकेटरचं विधान
IND vs SA, Final: नॉर्मल वाटलोय का? पहिल्याच षटकात विराटचे यान्सेनला 3 क्लासिक चौकार! पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com