IND vs AUS:या ३ खेळाडूंमुळे भारतीय संघाने मिळवला एकहाती विजय

या विजयात सर्वच खेळाडूंनी बहुमूल्य योगदान दिले. मात्र ३ असे खेळाडू होते, ज्यांनी विशेष कामगिरी करत भारतीय संघाला केवळ ३ दिवसांत विजय मिळवून दिला.
IND vs AUS
IND vs AUSSaam tv

IND vs AUS:बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे.

या विजयात सर्वच खेळाडूंनी बहुमूल्य योगदान दिले. मात्र ३ असे खेळाडू होते, ज्यांनी विशेष कामगिरी करत भारतीय संघाला केवळ ३ दिवसांत विजय मिळवून दिला.

आर अश्विन : भारतात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. या गोष्टीचा आर अश्विन पुरेपूर फायदा घेतो. त्यामुळेच तो वर्तमान भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजी समोर भले भले दिग्गज अडचणींचा सामना करताना दिसून येत असतात.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले. तर पहिल्या डावात ३ गडी बाद केले होते. हेच कारण आहे की, भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला.

IND vs AUS
IND VS AUS 1st Test :तिसऱ्या दिवशीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी! पहिल्या डावात घेतली इतक्या धावांची आघाडी

रोहित शर्मा : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये परतला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने कसोटीतील ९ वे शतक झळकावत १२० धावांची तुफानी खेळी केली.

त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४०० धावांचा डोंगर उभारला. या डावात भारतीय संघाने २२३ धावांची आघाडी घेतली होती.

IND vs AUS
Border-Gavaskar Trophy:भारताची दणदणीत सुरुवात! ऑस्ट्रेलियावर मिळवला १ डाव आणि १३२ धावांनी विजय

रवींद्र जडेजा : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या सामन्यातून जोरदार पुनरागमन केले आहे. गेली काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५ गडी बाद केले होते.

तर फलंदाजी करताना ७० धावांची खेळी केली होती. तसेच दुसरा डावात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com