Border-Gavaskar Trophy:भारताची दणदणीत सुरुवात! ऑस्ट्रेलियावर मिळवला १ डाव आणि १३२ धावांनी विजय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला
Border-Gavaskar Trophy
Border-Gavaskar Trophysaam tv

Border-Gavaskar Trophy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.(Latest sports updates)

या सामन्याचा हिरो ठरला तो भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा. ज्याने पहिला डावात गोलंदाजी करताना ५ गडी तर दुसऱ्या डावात त्याने २ गडी बाद केले. यासह त्याने फलंदाजी करताना, ७० धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना आर अश्विनने ५,मोहम्मद शमीने २ आणि अक्षर पटेलने १ गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ९१ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघय १७७ धावांवर संपुष्टात आला.

Border-Gavaskar Trophy
IND VS AUS 1st Test : शतक झळकावताच रोहितला मिळाली वाईट बातमी!उर्वरित सामन्यांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता

ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, मार्नस लाबुशेनने एकाकी झुंज देत ४९ धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. तर स्टीव्ह स्मिथने ३७ आणि ॲलेक्स कॅरीने ३१ धावांचे योगदान दिले होते.

भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी...

प्रत्युत्तरात भारतीय संघातील फलंदाजानी दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने १२० धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची धावसंख्या ७ गडी बाद २४० धावा इतकी होती. त्यानंतर अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत, भारतीय संघाची धावसंख्या ४०० पर्यंत पोहचवली.

या डावात अक्षर पटेलने ८४ तर रवींद्र जडेजाने ७० आणि मोहम्मद शमीने ३७ धावांचे बहुमूल्य योगदान देत भारतीय संघाला २२३ धावांची आघाडी मिळवून दिली.

Border-Gavaskar Trophy
IND vs AUS Match Betting : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचवर सट्टा; पोलिसांनी भर मैदानातून ४ जणांना उचललं

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ९१ धावांवर आटोपला..

भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टिचून फलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक २५ तर लाबुशेनने १७ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com