मावळ : मावळ लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच उमेदवारी असल्याचे सांगितले. (Maval) परंतु आपली उमेदवारी अमित शहा यांनीच फिक्स केल्याचा गौप्यस्फोट विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केला आहे. (Maharashtra News)
लोकसभा निवडणुक जवळ येऊ लागली, यामुळे सर्व पक्षांकडून मर्डर संघात दावे केले जात आहेत. त्यानुसार मावळमधील राजकारण तापू लागले आहेत. महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी मावळ लोकसभेवर दावा दाखवला आहे. मात्र विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत गौप्यस्फोट करत राजकारणाला वेगळे वळण दिले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे सर्व खासदार यांची बैठक पार पडली. त्यात शिंदे गटाच्या सर्व विद्यमान खासदारांना २०२४ ची उमेदवारी दिली जाणार आणि त्यांना निवडुन आणण्यासाठी भाजप जोमाने काम करणार; असा शब्द थेट गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा गौप्यस्फोट मावळ लोकसभेचे खासदार बारणे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.