Hardik Pandya: वानखेडेवर हार्दिकला ट्रोल कराल तर याद राखा; ट्रोल्सवर MCA करणार कठोर कारवाई

Hardik Pandya Trolling : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या १४ व्या सामन्यात सोमवारी मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya Yandex
Published On

MCA action on Hardik Pandya Trollers , MI vs RR, IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीगमधील १४ व्या सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. १७ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे फ्रँचायझीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. (Latest News)

फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापलेत. याची प्रचिती आयपीएलच्या सामन्यामध्येही दिसून आले आहे. मुंबई सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला चाहत्यांचा मोठा विरोध होत आहे. मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र हार्दिकला ट्रोल केले जात आहे. मुंबई संघाचा पुढील सामना हा घरच्या मैदानावर होणार आहे. या स्टेडियमवरही चाहते हार्दिकला ट्रोल करतील, असा अंदाज आहे. हार्दिकला ट्रोल केल्यामुळे त्याचा त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीये. ही सर्व बाब लक्षात घेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) ट्रोलिंग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका वृत्तानुसार एमसीएने सुरक्षा वाढवलीय. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्याला ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार जाईल. घरच्या मैदानावर प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी आव्हान असणार आहे. दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाल सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय.

या सलग पराभवानंतर एमसीएने हे पाऊल उचलले आहे.सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने चाहते हार्दिकला परत ट्रोल करतील. यामुळे सामन्यादरम्यान हार्दिकच्या विरोधात टिप्पणी किंवा घोषणाबाजी करणाऱ्या कोणत्याही प्रेक्षकाला ताब्यात घेण्यात येईल. आयपीएल २०२४ मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक आहे. संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. लीगच्या ५ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला.

शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादकडून ३१ धावांनी पराभव झाला होता. त्याचबरोबर आयीपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिलेली नाहीये. हार्दिकने गुजरात टायटन्सविरुद्ध ११ धावा केल्या होत्या. तसेच ३ षटकात ३० धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिकने संथ फलंदाजी केली. त्याने २० चेंडूत २४ धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही हार्दिकला खूप महागडा ठरला. त्याने ४ षटकात ११.५ च्या इकॉनॉमीसह ४६ धावा दिल्या.

Hardik Pandya
T20 World Cup 2024: विश्वकपसाठी 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, विराटला मिळेल का संधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com