आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकअखेर २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १० धावा करता आल्या. दरम्यान या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्स संघातील यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान इशान किशनने आयपीएल आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यासह त्याच्या मॅच फी वर १० टक्के दंड आकारला गेला आहे. इशानने आपली चूक मान्य केली आहे.
आयपीएलने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, 'इशान किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हन १ चा गुन्हा केला आहे. त्याने आपली चूक मान्य देखील केली आहे. लेव्हल १ च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.'
मुंबईचा पराभव..
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकअखेर २० गडी बाद ४ गडी बाद २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर २४७ धावा करता आल्या. हा सामना मुंबईला १० धावांनी गमवावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.