बीसीसीआयने नुकताच सेंट्रल कॉन्ट्र्र्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. या यादीतून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं आहे. या दोघांना सेंट्रल कॉन्ट्र्र्रॅक्टमधून वगळल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडलं आहे. याबाबत बोलताना वृद्धिमान साहाने देखील लक्षवेधी विधान केलं आहे.
वृद्धिमान साहाचं (Wriddhiman Saha) स्पष्ट मत आहे की, जर एखाद्या खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळायचं नसेल तर त्यांच्यावर तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही. इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांना वगळण्यावर वृद्धिमान साहाने आपलं मत मांडलं आहे. (Cricket news marathi)
वृद्धिमान साहा आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. दोन्ही खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळण्यावर वृद्धिमान साहा म्हणाला की, ' हा बीसीसीआयने घेतलेला निर्णय आहे आणि खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे. तु्म्ही जबरदस्ती करु शकत नाही.' इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांनंतर संघाबाहेर करण्यात आलं. त्यानंतर दोघांनाही संघाबाहेर असताना रणजी ट्रॉफी खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र दोघांनीही हे आदेश धुडकावून लावले.
याबाबत बोलताना वृद्धिमान साहा म्हणाला की,' जेव्हा मी फिट असतो तेव्हा मी क्रिकेट खेळतो. मी तर क्लब लेव्हल क्रिकेट देखील खेळतो. मी नेहमी एका सामन्याला एका सामन्याप्रमाणे घेतो. माझ्यासाठी सर्व सामने समान आहेत. जर प्रत्येक खेळाडूने असा विचार करायला सुरुवात केली तर तो खेळाडू आपल्या कारकिर्दीत समृद्ध होईल आणि हे भारतीय क्रिकेटसाठीही उत्तम असेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.