IPL Match Today : दिल्ली विरुद्ध मुंबईत घमासान, कोण जिंकणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

MI vs DC, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सनं जोरदार पुनरागमन केलं आहे. मागील चार सामन्यांतील तीन सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत करून दिल्लीचा संघ प्ले ऑफमधील संभाव्य स्थान भक्कम करू शकतो.
Mumbai Indians Vs Delhi Capitals
Mumbai Indians Vs Delhi CapitalsSAAM TV

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज, शनिवारी दुपारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार आहे. दिल्लीचं नेतृत्व रिषभ पंतकडे आहे, तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पंड्या करतोय. आयपीएलमधील हा ४३ वा सामना आहे. घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सला धूळ चारण्याचे मनसुबे रिषभच्या दिल्ली संघाचे असतील. तर हरवलेला सूर पुन्हा मिळवण्यासाठी तसेच प्ले ऑफच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्न करणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्लीला सूर गवसला नाही. सुरुवातीच्या काही सामन्यात किरकोळ चुकांमुळं दिल्लीला पराभव पत्करावा लागलाय. या चुकांमध्ये सुधारणा करून दिल्ली कॅपिटल्सनं जोरदार पुनरागमन केलं आहे. मागील चार सामन्यांतील तीन सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत करून दिल्लीचा संघ प्ले ऑफमधील संभाव्य स्थान भक्कम करू शकतो.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर मॅकगर्क, शाय होप, रिषभ पंत, स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्सर पटेल, कुलदीप यादव, अॅनरिच नॉर्ट्जे, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेअर - रसिषख सलाम, कुमार कुशाग्रा

काय आहे जमेची बाजू

रिषभ पंत सध्या कमालीचा फॉर्मात आहे. ही दिल्लीसाठी जमेची बाजू आहे. प्रत्येक सामन्यासरशी त्याची फलंदाजी बहरत आहे. त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास झळकतोय. स्टम्पच्या मागेही त्याची कामगिरी चांगली होतेय. कर्णधारपदाच्या दबावाला न जुमानता तो बेधडक फलंदाजी करत आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्यानं मॅचविनिंग खेळी केली होती.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ११ -

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, टीम डेविड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोइट्झे, पियुष चावला,जसप्रीत बुमराह.

इम्पॅक्ट प्लेअर - नुवान तुषारा आणि रोमारिओ शेफर्ड

मुंबई इंडियन्सचा दमदार खेळाडू

जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला अपेक्षित कामगिरी करत आहे. त्यानं आतापर्यंतच्या सामन्यांत १३ गडी बाद केले आहेत. टी २० सामन्यांत जवळपास सर्वच गोलंदाजांची धुलाई झालेली असताना जसप्रीत बुमराहला खेळणं प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना अवघड जात आहे. त्यानं आतापर्यंतच्या सामन्यात ६.३७ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

Mumbai Indians Vs Delhi Capitals
IPL 2024 Points Table: पंजाबच्या विजयाचा मुंबई इंडियन्सला मोठा फटका; हार्दिकचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार का?

दिल्ली- मुंबई आमनेसामने, आतापर्यंतची आकडेवारी

दिल्ली आणि मुंबई इंडियन्समध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले आहेत. त्यापैकी मुंबईने १९ वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने १५ सामने जिंकले आहेत.

अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघांची कामगिरी

अरुण जेटली मैदानात दोन्ही संघ ११ वेळा आमनेसामने आलेत. त्यातील ६ सामने दिल्लीने, तर मुंबईने ५ सामने जिंकले आहेत.

तर दिल्लीची कामगिरी बघितली तर, हा संघ या मैदानात ७९ सामने खेळला आहे. त्यातील ३३ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ४४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

पिच आणि वेदर रिपोर्ट

मागच्या दोन सामन्यांतील निकाल बघितला तर, अरुण जेटली स्टेडियममधील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई विरुद्ध दिल्ली सामना दुपारी होणार आहे. त्यावेळी आकाश निरभ्र असेल. पावसाची शक्यता नाहीच. तापमान साधारणपणे ३८ अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

Mumbai Indians Vs Delhi Capitals
IPL 2024 KKR vs PBKS : इडन गार्डनवर धावांचा पाऊस, षटकारांचा विक्रम ; ८ गडी राखून PBKS चा KKR वर मोठा विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com