उत्कंठावर्धक कथानक आणि रोज मिळत असलेले मालिकेला वळण यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेची (Satvya Mulichi Satavi Mulgi) कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या ह्या मालिकेने नुकतेच ५०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. सध्या सोशल मीडियावर ५०० एपिसोड्स पूर्ण केल्यानंतर मालिकेच्या सेटवर कलाकारांनी आणि निर्मात्यांनी जंगी सेलिब्रेशन केले आहे. त्यांचे सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. (Marathi Serial)
‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेची गणना केली जाते. कथानकामुळे या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांची नेहमीच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे हे कलाकार मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. कायमच आपल्या कथानकामुळे चर्चेत राहणाऱ्या ह्या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. ५०० एपिसोड पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन करताना मालिकेतील कलाकार मंडळींसह संपूर्ण टीम उपस्थितीत होती. (Tv Serial)
केक कापून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तू देण्यात आली. याशिवाय तुषार देवलने मालिकेचं शीर्षक गीत गायलं. याचा व्हिडीओ अभिनेत्री एकता डांगरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. तुषार गाणं गाताना पाहून चाहत्यांनी त्याच्या गाण्याचे कौतुक होत आहे. मालिकेतील इतर कलाकारांनीही सेलिब्रेशन करतानाचे काही व्हिडीओ शेअर केलेले आहेत. (Zee Marathi)
सप्टेंबर २०२२ पासून मालिका झी मराठीवर टेलिकास्ट होत आहे. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये, तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे व्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.