Milind Gawali Post
Milind Gawali Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: “जिथे कुठे असतील, तिथे सुद्धा ते…”, मिलिंद गवळीने दिल्या लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा

Chetan Bodke

Milind Gawali Post

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अभिनेता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कायमच आपल्या खासगी आयुष्यातला किस्सा सांगत असतात. अशातच पोस्ट करत अभिनेत्याने एक किस्सा सांगितला आहे. यावेळी अभिनेत्याने दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. (Marathi Actors)

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या, ‘मराठा बटालियन’ या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केलेला आहे. मिलिंद गवळीने पोस्टमध्ये लिहिलंय की, “लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर ‘मराठा बटालियन’मध्ये काम करायची संधी मिळाली. या सिनेमांमध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं. हा व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे; तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता. मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचं होतं. पहिलाच दिवस, पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “आपण रिहर्सल करूया ”, असं मला सांगून, मला कंफर्टेबल केलं. ” (Social Media)

“हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. अख्या शूटिंगभर हसत-खेळत, मजा-मस्ती करत हा ‘मराठा बटालियन’ त्यांनी पूर्ण केला. विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होतीच. त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे. सतत हसतं-खेळतं वातावरण ठेवायचे. विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले. मराठी इंडस्ट्रीमधले ते सगळ्यात बिझी स्टार होते. ऐकावेळेला त्यांचे सहा-सात सिनेमे चालूच असायचे, असा हा एकमेव स्टार होता ज्याच्या डबिंगसाठी, ‘ते‘ जिथे शूटिंग करत असतील, तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बूक केला जायचा. बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता.” (Marathi Film)

“फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते. ‘तू तू मी मी’ या एका नाटकात त्यांनी १४ भूमिका केल्या होत्या. रमेश भाटकर तर स्टायलाइज्ड स्टार होते आणि फार भारी कलाकार पण होते ते. या तिघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं. मला खूप प्रोत्साहन दिलं. कौतुक केलं. हे तिघेही दिग्गजच होते . पण कधीही त्यांनी गर्व केला नाही. उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकाराला खूप सांभाळून घेऊन काम केलं. सिनेमांचे जुने सीन्स बघत असताना सतत असं वाटतं की ते आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला सोडून गेलेच नाहीयेत. त्यांच्याबरोबर काम करणं मी सतत मिस करत असतो. ” (Marathi Film Industry)

“प्रेक्षकांच्या मनामध्ये तर त्यांनी त्यांची जागा निर्माण केलीच आहे. पण माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी जागा आहे. ते आता जिथे कुठे असतील, तिथे सुद्धा ते एकमेकांची खेचत असतील, मस्करी करत असतील. आजूबाजूंच्यांचं पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील, आनंद पसरवत असतील.” असं मिलिंद यांनी लिहिलं आहे. अभिनेत्याचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter List मधून 50 हजार नावं गायब? कल्याण-डोंबिवलीतील जागरूक मतदार हायकोर्टात धाव घेणार

Effects of Drinking Milk at Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध पिताय? 'या' गंभीर आजारांना देताय आमंत्रण

Survey: भारत होणार सर्वाधिक तरूण; २०३० पर्यंत ११.५ कोटी नोकऱ्या हव्यात!, ताज्या अहवालात नेमकं काय?

Gautam Gambhir: 'पाया पडलो नव्हतो, म्हणून...', निवडकर्त्यांबाबत गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा

Today's Marathi News Live : लोकसभेच्या निकालाआधी आढळराव कोल्हे समर्थकांची बँनरबाजी..!

SCROLL FOR NEXT