Lata Mangeshkar Award 2024: यंदाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' अमिताभ बच्चन यांना जाहीर, ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांनाही विशेष पुरस्काराने करणार सन्मानित

Lata Mangeshkar Award 2024 Announced: बॉलिवूडचे महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांना नुकताच यंदाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Lata Mangeshkar Award 2024
Lata Mangeshkar Award 2024 AnnouncedSaam Tv
Published On

Lata Mangeshkar Award 2024 Announced

बॉलिवूडचे महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांना नुकताच यंदाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. बिग बींसह मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बिग बींना हा पुरस्कार त्यांनी दिलेल्या सिनेकारकिर्दितल्या योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या वर्षी 'लता मंगेशकर पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले होते. आता २०२४ चा हा पुरस्कार बिग बींना देण्यात येणार आहे.

Lata Mangeshkar Award 2024
Aamir Khan Deepfake Video: आमिर खान ठरला डिपफेकचा बळी, राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव

पुरस्काराची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत मंगळवार (१६ एप्रिल) करण्यात आली आहे. यावेळी 'लता मंगेशकर पुरस्कार' आणि महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' सोहळ्याचीही काल घोषणा करण्यात आली. यावेळी, कला, संगीत, नाटक, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांनाही 'मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार'ने सन्मानित करण्यात येणार आहे.

'लता मंगेशकर पुरस्कार' आणि 'मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' येत्या २४ एप्रिलला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. २४ एप्रिलला दिनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा रंगणार आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांना 'लता मंगेशकर पुरस्कार', संगीतकार ए.आर.रेहमानला 'मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार', मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार', पद्मिनी कोल्हापूरेला 'मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार'

अतुल परचुरे यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार', बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाला 'मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार'ने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Lata Mangeshkar Award 2024
Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com